"मी त्या दिग्दर्शकाला लाथ मारुन बाहेर काढलं..."; फराह खानचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:28 IST2025-11-06T11:25:23+5:302025-11-06T11:28:53+5:30
फराह खानने नुकत्याच एका टॉक शोमध्ये तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव शेअर केला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत

"मी त्या दिग्दर्शकाला लाथ मारुन बाहेर काढलं..."; फराह खानचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?
बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानने (Farah Khan) नुकताच तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक अत्यंत धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. एका मोठ्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा फराहने त्याला न घाबरता योग्य प्रत्युत्तर दिलं होतं. काय होता तो किस्सा?
फराहसोबत काय घडलेलं?
फराह खान ही अभिनेत्री अनन्या पांडेसोबत टू मच विथ काजोल अँड ट्विंकल शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी फराहने हा किस्सा सर्वांसोबत शेअर केला. फराह म्हणाली, "तो दिग्दर्शक माझ्या खोलीत कोणत्यातरी गाण्याबद्दल बोलण्यासाठी आला होता. पण जेव्हा मी अंथरुणावर होते, तेव्हा तो माझ्या जवळ येऊन बसला. त्यानंतर मला त्याला तिथेच लाथ मारून खोलीतून बाहेर काढावं लागलं."
विशेष म्हणजे, अभिनेत्री ट्विंकल खन्नाने देखील फराह खानने सांगितलेल्या या घटनेला दुजोरा दिला आहे. ट्विंकल खन्नाने सांगितलं, "तो दिग्दर्शक फराहच्या मागे लागला होता, आणि फराहने खरंच त्याला लाथ मारली होती. मी स्वतः त्या वेळी तिथे उपस्थित होते." अशाप्रकारे फराहने त्या दिग्दर्शकाला जशास तसं उत्तर दिलं. त्यानंतर तो दिग्दर्शक फराहच्या मागे लागला नाही. अशाप्रकारे फराहच्या धाडसीपणाचं सर्वांनी कौतुक केलं. फराह खान सध्या तिचा कूक दिलीपसोबत युट्यूबवर व्लॉग व्हिडीओ बनवताना दिसते. फराह सध्या कोणत्याही नवीन सिनेमाची तयारी करताना दिसत नाहीये.