मलायका अरोराच्या वाढदिवशी Ex बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने दिलेल्या शुभेच्छा चर्चेत, म्हणाला- "अशीच तू..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 16:08 IST2025-10-23T16:06:00+5:302025-10-23T16:08:35+5:30
एक्स गर्लफ्रेंड मलायका अरोराच्या वाढदिवशी अर्जुन कपूरने लिहिलेली बर्थडे पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. पाहा काय म्हणाला अर्जुन?

मलायका अरोराच्या वाढदिवशी Ex बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने दिलेल्या शुभेच्छा चर्चेत, म्हणाला- "अशीच तू..."
बॉलिवूडची 'फिटनेस आयकॉन' आणि ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिने बुधवारी तिचा ५२ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या. मात्र, सर्वांचं लक्ष वेधलं ते तिचा एक्स बॉयफ्रेंड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याने दिलेल्या शुभेच्छांनी. काय म्हणाला अर्जुन?
अर्जुन कपूरचा भावनिक संदेश
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर गेल्या वर्षी वेगळे झाले. ब्रेकअपनंतरही त्यांच्यातील मैत्रीचं नातं कायम असल्याचं अर्जुनच्या पोस्टवरून स्पष्ट झालं. अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मलायकाचा एक सुंदर फोटो पोस्ट केला. हा फोटो पॅरिसमधील आहे, जिथे मलाइका आयफेल टॉवरच्या समोर पोज देताना दिसत आहे. या फोटोसोबत अर्जुनने लिहिलं की, “हॅप्पी बर्थडे मलायका... अशीच आयुष्यात भरारी घेत राहा. कायम हसत राहा आणि नेहमी नवीन गोष्टींचा शोध घेत राहा."
अर्जुनच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष लगेच वेधून घेतलं. दोघांचं नातं आता तुटलं असलं तरी त्यांच्यात असलेला आदर आणि आपुलकी आजही कायम आहे, अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त होत आहेत.
मलाइका अरोरा सध्या तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनयापेक्षा ती आता डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून जास्त सक्रिय आहे. नुकतीच ती 'थामा' (Thamma) या हॉरर कॉमेडी चित्रपटातील 'पॉयजन बेबी' या डान्स नंबरमध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. तर दुसरीकडे अर्जुन कपूर आपल्याला 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेबसीरिजमध्ये विशेष भूमिकेत दिसला.