आजही अंगावर काटे उभे करणारा इतिहास सांगतो चित्तौडगढचा किला, पाहा राणी पद्मावतीचा खरा राजवाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 17:31 IST2018-01-19T11:58:41+5:302018-01-19T17:31:29+5:30

अनेक वाद-विवादांनंतर येत्या 25 जानेवारीला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत चित्रपट प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. यात राणीची भूमिका दीपिका पादुकोण, शाहिद कपूर राजा रावल सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे.

Even today, the story about standing on the limb, the fort of Chittodgad, see Rani Padmavati's true palace | आजही अंगावर काटे उभे करणारा इतिहास सांगतो चित्तौडगढचा किला, पाहा राणी पद्मावतीचा खरा राजवाडा

आजही अंगावर काटे उभे करणारा इतिहास सांगतो चित्तौडगढचा किला, पाहा राणी पद्मावतीचा खरा राजवाडा

ेक वाद-विवादांनंतर येत्या 25 जानेवारीला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत चित्रपट प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. यात राणीची भूमिका दीपिका पादुकोण, शाहिद कपूर राजा रावल सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. तर  अलाऊद्दीन खिल्जीची भूमिका रणवीर सिंग साकारणार आहे. चित्तोडगढचा भव्यसेट संजय लीला भन्साळी यांनी मुंबईत साकारला. मात्र आज आम्ही तुम्हाला चित्तोडगढच्या खरा किला आणि राणी पद्मावतीचा राजवाडा दिखवणार आहोत जो आजही इतिहासातील ती भयावह गोष्ट सांगतो.   


राजा रावल सिंगची पत्नी पद्मावती अतिशय सुंदर होती. त्याच्या सौंदर्याची चर्चा दूर-दूरपर्यंत होती. ज्यावेळी राणीच्या सौंदर्याबाबत अलाऊद्दीन खिल्जीला समजते त्यावेळी राणीला बघण्यासाठी उत्सुक होतो. पद्मावतीला बघण्यासाठी तो राजा रावल सिंगला भेटायला येतो. अलाऊद्दीन खिल्जी राणीला बघण्याची इच्छा व्यक्त करतो. मात्र राणी त्याच्यासमोर येत नाही ती त्याला आरशाच्या माध्यमातून बघायला सांगते. खिल्जी राणी पद्मावतीची एक झलक आरशा बघून वेडा होता आणि मग तो पद्मावतीला मिळवण्यासाठी सैराभैरा होतो. 



 
राणीला मिळवण्यासाठी तो चित्तोडगढवर हल्ला करतो. या युद्धात राजा रावल सिंगचा मृत्यु होत्या. खिल्जीला वाटतो आता राणी त्याची मात्र राणी पद्मावती पतीच्या मुत्यूची बातमी ऐकताच बाकी राजपूत स्त्रीयांसोबत स्वत:ला अग्निकुंडात उडी मारते. खिल्जी ज्यावेळी राजवाड्यात येतो तेव्हा त्याला राणी पद्मावतीची राख मिळते.  


चित्तोडगढचा किला आज पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. हा राजवाडात आता वाईट परिस्थित आहे. फक्त इथला इतिहास जाणून घेण्यासाठी पर्यटक याठिकाणाला भेट देतात.  
संजय लीला भन्साळी हाच इतिहास मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करत होता मात्र  भन्साळी यांनी इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत त्याला करणी सेनेने विरोध केला. उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्र आणि उत्तराखंड या राज्यात पद्मावत रिलीज होणार नव्हता. मात्र चार राज्यांनी लादलेल्या बंदीविरोधातील याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने ‘पद्मावत’ला हिरवी झेंडी देत ‘पद्मावत’वर बंदी लादणा-या राज्यांचे चांगलेच कान टोचले. त्यामुळे येत्या २५ तारखेला हा चित्रपट आता सर्व राज्यांत प्रदर्शित होऊ शकेल.  सेन्सॉर बोर्डाने पास केल्यानंतर कुठलेही राज्य कुठल्याही चित्रपटावर बंदी घालू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले.

Web Title: Even today, the story about standing on the limb, the fort of Chittodgad, see Rani Padmavati's true palace