'दृश्यम ३'च्या रिलीज डेटवर आली अपडेट, अजय देवगणच्या आधी मोहनलालचा सिनेमा येणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:19 IST2025-12-11T12:17:15+5:302025-12-11T12:19:49+5:30
अजय देवगणच्या 'दृश्यम ३'वर साउथ दिग्दर्शक म्हणाले...

'दृश्यम ३'च्या रिलीज डेटवर आली अपडेट, अजय देवगणच्या आधी मोहनलालचा सिनेमा येणार?
बॉलिवूडचा सर्वात कल्ट सस्पेन्स 'दृश्यम' सिनेमाचा तिसऱ्या भागाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. तीन वर्षांपूर्वी 'दृश्यम २' आला होता आणि हाही सिनेमा तुफान चालला होता. 'दृश्यम'ने मल्याळममध्ये मोहनलाल आणि हिंदीत अजय देवगणला प्रचंड यश मिळवून दिलं. अजय देवगणचा 'दृश्यम' मल्याळम सिनेमाचाच रिमेक आहे. पाच महिन्यांपूर्वीच मोहनलालच्या मल्याळम 'दृश्यम ३'चं शूट सुरु होतं.'दृश्यम ३'च्या रिलीजबद्दल अपडेट आलं आहे.
'दृश्यम ३'च्या रिलीजबद्दल दिग्दर्शकाने अपडेट दिलं आहे. मल्याळम आणि हिंदी दोन्ही व्हर्जन पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अजय देवगणच्या 'दृश्यम ३'चं शूट अद्याप सुरु झालेलं नाही. तर मोहनलालच्या सिनेमाच्या शूट अंतिम टप्प्यात आलं हे. याचा अर्थ मल्याळम सिनेमा आधी थिएटरमध्ये रिलीज होईल. त्यानंतर प्रेक्षकांना हिंदी व्हर्जन पाहता येणार आहे. मल्याळम सिनेमाचे दिग्दर्शक जीतू जोसेफ म्हणाले, "सध्या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरु आहे. येत्या तीन-चार आठवज्यात सिनेमाच्या रिलीजची घोषणा होईल. आमचा सिनेमा हिंदी व्हर्जनच्या आधी येत आहे ही चांगली गोष्ट आहे."
जीतू जोसेफ यांनी ही माहिती मंगळवारी संध्याकाळी चेन्नई येथे जिओ हॉटस्टारच्या साउथ स्लेटच्या घोषणेवेळी दिली. 'दृश्यम ३'चं शूट याच महिन्यात पूर्ण झालं आहे. हिंदी व्हर्जनचं दिग्दर्शन अभिषेक पाठक करणार आहे. सिनेमात अजयसोबत तब्बू आणि अक्षय खन्ना यांचीही भूमिका आहे.
काही दिवसांपूर्वीही जीतू जोसेफ यांनी स्पष्ट केलं होतं की ते आता थ्रिलर बनवून थकले आहेत. त्यामुळे आता ते या सिनेमातही थ्रिल आणणार नाहीत. सिनेमाची गोष्ट दुसऱ्या पार्टच्या शेवटापासूनच सुरु होणार आहे. 'दृश्यम'च्या दोन्ही भागांच्या कथेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. आता तिसऱ्या भागाकडूनही प्रेक्षकांना अपेक्षा आहेत.