'दृश्यम-२' च्या दिग्दर्शकाच्या घरी गुडन्यूज! लग्नाच्या २ वर्षांनी हलणार पाळणा, पत्नीही आहे लोकप्रिय अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:04 IST2025-12-19T11:59:04+5:302025-12-19T12:04:35+5:30
हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शकाने नुकतीच सोशल मीडियावर आनंदाची बातमी शेअर केली आहे.लग्नानंतर दोन वर्षांनी हा मराठमोळा दिग्दर्शक बाबा होणार आहे.

'दृश्यम-२' च्या दिग्दर्शकाच्या घरी गुडन्यूज! लग्नाच्या २ वर्षांनी हलणार पाळणा, पत्नीही आहे लोकप्रिय अभिनेत्री
Abhishek Pathak And Shivalika Oberoi: २०२२ मधील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘दृश्यम २’.या चित्रपटाचा दिग्दर्शक अभिषेक पाठकने नुकतीच सोशल मीडियावर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिषेकने त्याची गर्लफ्रेंड शिवालिका ओबेरॉयशी २०२३ मध्ये गोव्यात लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षानंतर या कपलच्या आयुष्यात आता नव्या सदस्याचं आगमन होणार आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय दिग्दर्शक अभिषेक पाठकच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. नुकतीच सोशल मीडियावर अभिषेक आणि त्याची पत्नी शिवलिका ओबेरॉयनेया दोघांनी ही गुडन्यूज एक हटके पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘Our love story has found it’s sweetest verse — a tiny blessing is joining our universe’ असं लिहिलं आहे. सध्या सिनेसृष्टीतील कलाकार आणि नेटकरी या कपलला भरभरुन शुभेच्छा देत आहेत.
अभिषेक पाठक पॅनोरमा स्टुडिओजचे संस्थापक कुमार मंगत पाठक यांचा मुलगा आहे. अभिषेकनेही पॅनोरमा स्टुडिओ अंतर्गत मराठी सिनेमांचीही निर्मिती केली आहे. यामध्ये मराठमोळ्या प्राजक्ता माळीचा नुकताच रिलीज झालेला 'फुलवंती'ही आहे. तसंच 'घरत गणपती' सिनेमाही त्यांनीच निर्मित केला आहे.
पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री!
अभिनेत्री शिवलिका ओबेरॉयने ‘ये साली आशिकी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. शिवालिका ओबेरॉयने ‘खुदा हाफिज’ आणि ‘खुदा हाफिज २’ मध्ये काम केलं आहे. ‘खुदा हाफिज’ चित्रपटाचा दिग्दर्शक अभिषेक पाठक होता.या चित्रपटाच्या सेटवर अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉय यांची भेट झाली. अभिषेकने तुर्कीमध्ये शिवालिकाला प्रपोज केलं होतं.