खांद्यावर हात नको ठेऊ! अक्षय कुमार चाहत्यावर भडकला, मुंबई एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 14:17 IST2025-10-19T14:16:38+5:302025-10-19T14:17:14+5:30
अक्षय कुमार त्याच्या एका चाहत्यावर चांगलाच भडकला आहे. काय घडलं नेमकं? बातमीवर क्लिक करुन व्हिडीओ बघा

खांद्यावर हात नको ठेऊ! अक्षय कुमार चाहत्यावर भडकला, मुंबई एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा नेहमीच चाहत्यांशी नम्रपणे वागण्यासाठी ओळखला जातो. मात्र, नुकतंच मुंबई एअरपोर्टवरील एका घटनेमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. एअरपोर्टवर एक चाहता सेल्फी घेण्यासाठी त्याच्या जास्त जवळ आल्याने, अक्षय कुमारला राग अनावर झाला आणि त्याने त्या चाहत्याला सर्वांसमोर सुनावले. काय घडलं नेमकं? अक्षय कुमारचा राग अनावर का झाला?
अक्षय कुमारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अक्षय कुमार मुंबई एअरपोर्टवर आलेला असतो. पण अशातच त्याला चाहते घेरतात. अनेक लोक सेल्फी घेण्यासाठी पुढे येतात. या गर्दीत एक चाहता सेल्फी काढण्यासाठी अक्षय कुमारच्या अगदी जवळ आला. त्याने अक्षयच्या पाठीवर हात ठेवला. त्यामुळे अक्षय कुमार काहीसा अवघडला. त्याने त्या चाहत्याला फटकारलं आणि दूर व्हायला सांगितलं. हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युझर्सनी अक्षय कुमारला पाठिंबा दिला. चाहत्यांनी कलाकारांना भेटताना मर्यादा पाळणं किती महत्त्वाचं आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. काहींनी लिहिलं की, चाहत्यांनी मर्यादा ओलांडू नये, कारण कलाकारांना काहीवेळा अवघडलेपणा येतो. अशाप्रकारे अनेकांनी अक्षय कुमार जे वागला त्याचं समर्थन केलंय. अक्षयच्या आगामी 'हेराफेरी ३', 'हैवान', 'भूत बंगला' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.