पैसा वसूल! २२५ कोटींचं बजेट असलेल्या 'धुरंधर'ची ३०० कोटींपर्यंत मजल; रणवीर सिंगच्या सिनेमाची बक्कळ कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 12:26 IST2025-12-14T12:25:40+5:302025-12-14T12:26:04+5:30
पहिल्या दिवसापासूनच 'धुरंधर'चे शो हाऊसफूल होत आहेत. या सिनेमाने १० दिवसांतच ३०० कोटीपर्यंतचा गल्ला जमवला आहे. 'धुरंधर' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.

पैसा वसूल! २२५ कोटींचं बजेट असलेल्या 'धुरंधर'ची ३०० कोटींपर्यंत मजल; रणवीर सिंगच्या सिनेमाची बक्कळ कमाई
Dhurandhar: रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जिकडे तिकडे धुरंधर' या अॅक्शन स्पाय थ्रिलर सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमातून पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेरांच्या गुप्त कारवायांची कहाणी दाखवण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासूनच 'धुरंधर'चे शो हाऊसफूल होत आहेत. या सिनेमाने १० दिवसांतच ३०० कोटीपर्यंतचा गल्ला जमवला आहे. 'धुरंधर' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
'धुरंधर'ने पहिल्याच दिवशी २८ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर शनिवार-रविवारी सिनेमाने ७५ कोटी कमावले होते. पहिल्या तीनच दिवसांत 'धुरंधर'ने १०० कोटींपर्यंत मजल मारली होती. तर पहिल्या आठवड्यात २०० कोटी पार केले होते. आता सिनेमाने ३०० कोटींच्या घरात एन्ट्री केली आहे. ९व्या दिवशी 'धुरंधर'ने ५३ कोटींचा गल्ला जमवला आहे. आता १०व्या दिवशी रणवीर सिंगचा 'धुरंधर' ३०० कोटींचा टप्पा पार करेल.
रणवीर सिंग, आर माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन अशी 'धुरंधर' सिनेमाची स्टारकास्ट आहे. आदित्य धरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. लवकरच हा सिनेमा ओटीटीवरही प्रदर्शित होणार आहे. तब्बल १५० कोटींना 'धुरंधर'च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाचं ओटीटी डील झाल्याची माहिती आहे.