ओटीटी प्लॅटफॉर्मवरही 'धुरंधर'ने तोडला रेकॉर्ड! नेटफ्लिक्सने तब्बल 'इतक्या' कोटींमध्ये खरेदी केला सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 09:56 IST2025-12-24T09:56:27+5:302025-12-24T09:56:51+5:30
धुरंधर सिनेमासोबत नेटफ्लिक्सने मोठा करार केला असून सिनेमा खरेदी करण्यांसाठी इतक्या कोटींची बोली लावल्याची चर्चा आहे. जाणून घ्या

ओटीटी प्लॅटफॉर्मवरही 'धुरंधर'ने तोडला रेकॉर्ड! नेटफ्लिक्सने तब्बल 'इतक्या' कोटींमध्ये खरेदी केला सिनेमा
सुपरस्टार रणवीर सिंगचा 'धुरंधर' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. आता या चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म 'नेटफ्लिक्स'ने या चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स विकत घेण्यासाठी विक्रमी करार लावली आहे. जो वाचून तुम्हीही आश्चर्याने थक्क व्हाल.
इतक्या कोटींचा झाला व्यवहार
मीडिया रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सने 'धुरंधर'चे डिजिटल अधिकार तब्बल २८५ कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. एखाद्या भारतीय चित्रपटासाठी हा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यवहारांपैकी एक मानला जात आहे. बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिक कमाई केल्यानंतर आता या ओटीटी डीलमुळे चित्रपटाच्या एकूण नफ्यात मोठी भर पडली आहे.
दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाची दमदार स्टारकास्ट आणि देशप्रेमावर आधारित थरारक कथा यामुळे या चित्रपटाची ओटीटीवरही प्रचंड मागणी आहे. 'नेटफ्लिक्स'ला या चित्रपटाद्वारे मोठा प्रेक्षकवर्ग मिळण्याची खात्री असल्याने त्यांनी ही मोठी रक्कम मोजली आहे.
कधी होणार ओटीटीवर रिलीज?
'धुरंधर' चित्रपट सध्या चित्रपटगृहात चांगली कमाई करत असल्यामुळे, तो लगेच ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार नाही. साधारणपणे थिएटर रिलीजच्या ४५ ते ६० दिवसांनंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांसाठी उपलब्ध होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच जानेवारी २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होईल. आदित्य धर यांच्या 'उरी'नंतर 'धुरंधर'ने देखील प्रेक्षकांचं मन जिंकलं असून २८५ कोटींच्या नेटफ्लिक्स डीलमुळे रणवीर सिंगच्या नावावर आणखी एक मोठा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.