नकारात्मक भूमिका अंगाशी आली! 'धुरंधर' फेम अभिनेत्याला आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्या, नेमकं काय झालेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 13:10 IST2025-12-15T13:07:57+5:302025-12-15T13:10:47+5:30
पात्रांच्या मृत्यूचा प्रेक्षकांनी घेतला धसका! थेट दिलेल्या धमक्या, 'धुरंधर' फेम अभिनेत्यासोबत घडलेलं असं काही; म्हणाला..

नकारात्मक भूमिका अंगाशी आली! 'धुरंधर' फेम अभिनेत्याला आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्या, नेमकं काय झालेलं?
Dhurandhar Actor Rakesh Bedi: अलिकडेच रणवीर सिंह स्टारर आणि आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. देशभरातील चित्रपटगृहांमध्ये धुरंधर प्रचंड यश मिळवत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, संजय दत्त व अक्षय खन्ना यांच्यासह अभिनेते राकेश बेदी यांनी जमील जमाली या पाकिस्तानी राजकारण्याची भूमिका साकारून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे.याचदरम्यान, दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने केलेल्या वक्तव्याची चर्चा होताना दिसतेय.दरम्यान, त्यांनी एका जुन्या चित्रपटाचा उल्लेख केला, ज्याच्या प्रदर्शनानंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.
अभिनेते राकेश बेदी यांनी आजवर बऱ्याच हिंदी टीव्ही मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विनोदी आणि गंभीर भूमिकांनी बॉलिवूडमध्ये स्वत चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अलिकडेच धुरंधर सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी पिंकविला ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये १९८१ मध्ये आलेल्या ‘एक दूजे के लिए’ या चित्रपटाच्या काही आठवणी शेअर केल्या. ‘एक दूजे के लिए’ सिनेमात कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तर राकेश यांनी व्हिलन साकारला होता. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत राकेश बेदी म्हणाले,"तुम्हाला माहिती आहे का, 'एक दूजे के लिए' चित्रपटानंतर मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. कारण, त्या चित्रपटातील दोन्ही हीरो-हीरोईनचा मृत्यू माझ्यामुळे होतो.मी चित्रपटात साकारत असलेल्या
पात्रामुळे एक गैरसमज निर्माण झाला.कारण मी सुद्धा चित्रपटात त्या मुलीच्या प्रेमात असल्याचं दाखवण्यात आलं होतं."
त्यानंतर ते म्हणाले, चित्रपटात मी खलनायकाची भूमिका साकारत होतो. पण, त्या भूमिकेला एक विनोदी बाज होता. ते पात्र त्या दोघांच्याही मृत्यूचं कारण ठरतं. त्या काळात लोकांचा चित्रपटांशी एक वेगळाच कनेक्ट होता.आजकाल तसं चित्र
पाहायला मिळत नाही.पण 'धुरंधर'ने ती क्रेझ पुन्हा निर्माण करत प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवलं . शिवाय मुलाखतीत त्यांनी हे देखील उघड केलं की, 'धुरंधर' चित्रपटाच्या निर्मात्यांवर त्याला चित्रपटात न घेता, त्याऐवजी दुसऱ्या एका मोठ्या स्टारला कास्ट करण्यासाठी दबाव आणला जात होता. मात्र, दिग्दर्शक आदित्य धर आपल्या निर्णयावर ठाम राहिले.