'पठान का ट्रेलर देखा या नहीं?'Deepika Padukone ने पापाराझीला विचारला प्रश्न अन्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 04:08 PM2023-01-11T16:08:46+5:302023-01-11T17:36:18+5:30

दिपिका पादुकोण स्टायलिश लूकमध्ये एअरपोर्टवर दिसली. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतले ते म्हणजे दीपिका आणि पापाराझी यांच्यातील संभाषणाने.

Deepika padukone uncontrollable sexy poses for paparazzi ask pathaan trailer dekha kya | 'पठान का ट्रेलर देखा या नहीं?'Deepika Padukone ने पापाराझीला विचारला प्रश्न अन्

'पठान का ट्रेलर देखा या नहीं?'Deepika Padukone ने पापाराझीला विचारला प्रश्न अन्

googlenewsNext

Deepika Padukone with paparazzi:दीपिका पादुकोण  (Deepika Padukone) आज म्हणजेच बुधवारी सकाळी मुंबई विमानतळावर दिसली. तिथून आता अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दीपिका नेहमीप्रमाणेच तिच्या स्टायलिश लूकमध्ये दिसत होती. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतले ते म्हणजे दीपिका आणि पापाराझी यांच्यातील संभाषणाने. एअरपोर्टच्या आत जाण्यापूर्वी दीपिकाने फोटोग्राफर्सना विचारले की तिने 'पठाण ट्रेलर' (Pathaan Trailer) चा ट्रेलर पाहिला का? आता सोशल मीडियावर या व्हिडिओवर लोक कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.


कुल लूकमध्ये दीपिकाचा स्वॅग
दीपिका पादुकोण (Deepika Padukone) नेहमीप्रमाणेच तिच्या कम्फर्टेबल लूकमध्ये लांब वुलन ग्रे ड्रेसमध्ये दिसली.आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की दीपिका तिच्या कारमधून बाहेर पडली आणि विमानतळाच्या गेटच्या दिशेने निघाली तेव्हा तिने चेहऱ्यावर मोठी स्माईल देत फोटोग्राफर्सना पोझ दिली. यानंतर पापाराझींनी दीपिकाला हळू चालण्यास सांगितले, तेव्हा अभिनेत्री म्हणाली, 'मी यापेक्षा हळू कसे चालू शकते?' त्यानंतर लगेचच दीपिकाने पापाराझींना विचारले- 'तुम्ही ट्रेलर पाहिला की नाही?'

दीपिका पादुकोण, शाहरुख खान आणि जॉन अब्राहमच्या 'पठाण' चित्रपटाचा त ट्रेलर काल म्हणजेच १० जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. 'पठाण'चा ट्रेलरही लोकांना खूप आवडला आहे. पठाणच्या ट्रेलरची सुरूवात दुबईतील बुर्ज खलिफा येथून होते. जॉन अब्राहम एका मोठ्या काडतुसाने कार उडवताना दिसतो आहे. चेहऱ्यावरून मास्क काढतो आणि पार्श्वभूमीत डिंपल कपाडियाचा दमदार आवाज येतो. हा चित्रपट एका खासगी दहशतवादी गट एक्सला पकडण्यावर आधारित आहे, ज्यामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिका साकारणार आहे. चाहत्यांना किंग खानकडून खूप अपेक्षा घेऊन बसले आहेत. चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्यांनाही का लावले नाही.
 

Web Title: Deepika padukone uncontrollable sexy poses for paparazzi ask pathaan trailer dekha kya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.