दीपिका पादुकोण-रणवीर सिंग आई-बाबा होणार ? अभिनेत्रीचे बेबी बंप लपवतानाचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 16:09 IST2024-02-20T16:03:25+5:302024-02-20T16:09:20+5:30

अभिनेत्री प्रेग्नंट असल्याचं बोललं जात आहे.

Deepika Padukone And Ranveer Singh Expecting Their First Baby Deepika In Her Second Trimester | दीपिका पादुकोण-रणवीर सिंग आई-बाबा होणार ? अभिनेत्रीचे बेबी बंप लपवतानाचे फोटो व्हायरल

दीपिका पादुकोण-रणवीर सिंग आई-बाबा होणार ? अभिनेत्रीचे बेबी बंप लपवतानाचे फोटो व्हायरल

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण  हिच्याबद्दल एक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री प्रेग्नंट असल्याचं बोललं जात आहे. तिचे काही फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दीपिका बेबी बंप लपवताना दिसत आहे. तिने साडीने तिचं पोट झाकलं होतं, जेणेकरून ते कॅमेऱ्यात दिसू नये. यामध्ये कितपत तथ्य आहे, हे लवकरच समजेल. पण, सध्या इंटरनेटवर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

द वीकच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, दीपिका आणि रणवीरच्या जवळच्या व्यक्तीने त्यांना याबाबत माहिती दिली आहे.  दीपिका आणि रणवीर लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार असून अभिनेत्री सध्या दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये असल्याची माहितीही यामध्ये देण्यात आली आहे.  नुकत्याच झालेल्या बाफ्टा अवॉर्ड्स 2024 मध्ये दीपिका पदुकोण साडीत दिसली. यावेळी ती तिचा बेबी बंप लपवताना दिसली. त्यामुळे त्यांच्या घरी गूड न्यूज आहे, हे बऱ्यापैकी कर्न्फम झालं आहे.

बाफ्टा अवॉर्ड्समधील दीपिकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण, सध्या याबाबत रणवीर आणि दीपिकाकडून दुजोरा दिलेला नाही. पण, चाहते त्यांच्या अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान दोन महिन्यांपूर्वीच दीपिका पदुकोणने सिंगापूर वोगला दिलेल्या मुलाखतीत लवकरच कुटुंब सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

दीपिका आणि रणवीर सिंग यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर  2018 साली लग्न केलं. दोघांची पहिली भेट 2012 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'राम लीला' चित्रपटादरम्यान झाली होती. ज्यामध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं.  वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिका नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फायटर' चित्रपटात दिसली होती. रणवीर शेवटचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसला होता. यानंतर तो लवकरच 'सिंघम 3' आणि 'डॉन 3' मध्ये दिसणार आहे. 

Web Title: Deepika Padukone And Ranveer Singh Expecting Their First Baby Deepika In Her Second Trimester