आलिया भट्टची हुबेहूब नक्कल करणाऱ्या तरुणीनं विकत घेतला अक्षय कुमारचा फ्लॅट; गृहप्रवेशाचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 04:30 PM2024-02-11T16:30:12+5:302024-02-11T16:32:19+5:30

आलिया भट्टची हुबेहूब नक्कल करणाऱ्या तरुणीनं अक्षय कुमारचा फ्लॅट विकत घेतला आहे.

Content creator chandni bhabhda who mimics alia bhatt buys akshay kumar flat in andheri | आलिया भट्टची हुबेहूब नक्कल करणाऱ्या तरुणीनं विकत घेतला अक्षय कुमारचा फ्लॅट; गृहप्रवेशाचे फोटो व्हायरल

आलिया भट्टची हुबेहूब नक्कल करणाऱ्या तरुणीनं विकत घेतला अक्षय कुमारचा फ्लॅट; गृहप्रवेशाचे फोटो व्हायरल

आलिया भट्टची हुबेहूब नक्कल करून सोशल मीडियावर चर्चेत आलेली एक कंटेट क्रिएटर म्हणजे चांदनी.  गरीबांची आलिया भट्ट असेही तिला म्हटलं जातं. सोशल मीडियावर आलियाची मीमिक्री करुन तिनं प्रचंड लोकप्रियता मिळवली. यातच आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. तिनं  मुंबईतील अंधेरी परिसरात स्वत:चं घर विकत घेतलं आहे.

चांदनीनं वयाची पंचविशी गाठण्याआधीच स्वकमाईतून घर घेतलं. विशेष म्हणजे तिने अंधेरीतील अभिनेता अक्षय कुमारचा फ्लॅट विकत घेतल्याचं म्हटलं जातं आहे. चांदनीनं नवीन घरात नुकताच प्रवेश केला आहे. गृहप्रवेशाचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. काही वेळातच फोटोंना खूप लाईक्स मिळालेत. चांदनीच्या कुटुंबीयांना तिचा खूप अभिमान वाटतो. तर चांदनीचे चाहते सुद्धा तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

चांदनी ही एक सोशल मीडिया इंफ्ल्युअर्स आहे. सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. चांदणीनं कायद्याची पदवी घेतली आहे. चांदनी सर्वात जास्त चर्चेत आली होती, जेव्हा तिनं ब्रह्मास्त्र चित्रपटातील आलिया भट्टच्या 'शिवा-शिवा' या डायलॉगची मिमिक्री केली होती.  खास म्हणजे चांदनीची ही मिमिक्री पाहून खुद्द आलिया भट्टही थक्क झाली होती आणि तिनं चांदनीचं कौतुकही केलं होतं. आलिया शिवाय चांदणी बॉलिवूडमधील इतर कलाकारांचीही खूप चांगल्याप्रकारे मिमिक्री करते. 

Web Title: Content creator chandni bhabhda who mimics alia bhatt buys akshay kumar flat in andheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.