कंगनाचा Emergency, राशाचा Azaad, फक्त ९९ रुपयांत पाहा कोणताही सिनेमा, कुठे अन् कसं त्यासाठी वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:11 IST2025-01-16T14:03:53+5:302025-01-16T14:11:51+5:30

फक्त ९९ रुपयांमध्ये तुमच्या आवडत्या चित्रपटाचा आनंद घ्या.

Cinema Lovers Day On 17 January Watch Kangana Ranaut's Emergency And Aaman Devgn, Rasha Thadani's Azaad | कंगनाचा Emergency, राशाचा Azaad, फक्त ९९ रुपयांत पाहा कोणताही सिनेमा, कुठे अन् कसं त्यासाठी वाचा...

कंगनाचा Emergency, राशाचा Azaad, फक्त ९९ रुपयांत पाहा कोणताही सिनेमा, कुठे अन् कसं त्यासाठी वाचा...

Cinema Lover Day 2025:  सर्व सिनेरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १७ जानेवरी रोजी देशभरात Cinema Lover Day 2025 साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने या दिवशी केवळ ९९ रुपयांमध्ये चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचा आनंद घेता येईल. जाणून घ्या ९९ रुपयांमध्ये कोणता सिनेमा पाहू शकता आणि तिकीट कसे बुक करायचे. 

चित्रपट उद्योगात प्रेक्षकांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन मजबूत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या खास दिवशी अभिनेत्री कंगना राणौतचा बहुप्रतिक्षित चित्रपट ' 'इमर्जन्सी' प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा विषय आणि कंगनाचा उत्कृष्ट अभिनय आधीच चर्चेचा विषय बनला आहे. ९९ रुपयांत 'इमर्जन्सी' पाहणे हे सिनेमाप्रेमींसाठी एखाद्या भेटवस्तूपेक्षा कमी नसेल. कंगनाच्या 'इमर्जन्सी' सोबतच अभिनेत्री रवीना टंडनची लेक राशा थडानी आणि अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण यांचा डेब्यू चित्रपट 'आझाद' देखील १७ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांसाठी आकर्षण असणार आहेत. 


अभिनेता सोनू सूदचा 'फतेह',  राम चरण याचा 'गेम चेंजर', शाहरुख खान याचा 'मुफासा: द लायन किंग' तसेच 'पुष्पा २' देखील केवळ ९९ रुपयांमध्ये पाहता येणार आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड आणि प्रादेशिक चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. या ऑफरमध्ये 'वुल्फ मॅन' आणि 'अ रिअल पेन' सारखे लोकप्रिय हॉलिवूड चित्रपट देखील आहेत. याशिवाय, तुम्हाला 'कहो ना प्यार है', 'ये जवानी है दिवानी' आणि 'सत्या' हे पुन्हा प्रदर्शित झालेले चित्रपट पाहण्याची संधी देखील मिळेल.

तिकिटे अशी बुक करा

जर तुम्हाला या दिवसाचा फायदा घ्यायचा असेल तर त्वरा करा, तिकीट बुकिंगची प्रक्रिया अगदी सोपी आहे.

 

  • ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी, प्रथम बुक माय शो किंवा इतर  प्लॅटफॉर्मच्या अधिकृत वेबसाइटवर जा. यानंतर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
  • प्रथम BookMyShow वर जा.
  • शहर निवडा,तुमचा आवडता चित्रपट, मग तारीख आणि वेळ निवडा.
  • देशभरात केवळ ९९ रुपयांना तिकीट उपलब्ध होतील.
  • शेवटी पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा आणि तुमचे तिकीट कन्फर्म होईल.

 

'सिनेमा प्रेमी दिन' हा असा दिवस आहे, जेव्हा प्रत्येकजण मोठ्या पडद्यावर अतिशय परवडणाऱ्या किमतीत उत्तम चित्रपट अनुभवू शकतो. ही ऑफर सिनेमाची जादू पुन्हा जिवंत करण्यासाठी आणि प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणण्यासाठीच्या उपक्रमाचा एक भाग आहे. मग तुम्ही कशाची वाट पाहत आहात? १७ जानेवारी रोजी फक्त ९९ रुपयांमध्ये तुमच्या आवडत्या चित्रपटाचा आनंद घ्या.

Web Title: Cinema Lovers Day On 17 January Watch Kangana Ranaut's Emergency And Aaman Devgn, Rasha Thadani's Azaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.