"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:46 IST2025-11-26T12:45:02+5:302025-11-26T12:46:08+5:30
मी त्याला भेटलेच नाही, त्यानेच मला मेसेज करुन..., कोरिओग्राफरने स्टेटस व्हायरल

"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि गायक पलाश मुच्छल यांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. स्मृतीच्या सांगली शहरात हा शाही विवाह सोहळा पार पडत होता. मेहंदी, संगीत हे फंक्शन्सही झाले. पण अचानक लग्न पुढे ढकलल्याची बातमी आली आणि सर्वांनाच आश्चर्य वाटलं. स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पलाशचीही तब्येत बिघडल्याची बातमी आली. दरम्यान दोन दिवसांपूर्वी एक भलतीच चर्चा सुरु झाली. पलाश मुच्छल स्मृतीला चीट करत असून त्याचे एका कोरिओग्राफरसोबतचे चॅट्स व्हायरल झाले. कोरिग्राफरने स्वत:च ते चॅट्स समोर आणले. आता तिने आणखी काही स्टेटस ठेवत आपली यात काहीच चूक नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
पलाश मुच्छलचे ज्या कोरिओग्राफरसोबत कथित चॅट्स व्हायरल झाले ती आहे मेरी डीकोस्टा. बातमी व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर सर्वांनीच मेरीला सर्च करायला सुरुवात केली. तिचे अनेक प्रोफाईल दिसले. आता तिच्या एका प्रोफाईलवरुन स्टोरी अपलोड झाल्या आहेत. यात ती म्हणते, "लोक मला समजून घेतील असं मला वाटलं होतं. कारण त्या चॅट्समध्ये हे स्पष्ट दिसतंय की माझी काहीच चूक नाही. उलट मीच त्याला हूल दिली(भेटलेच नाही) आणि मी कधीच कोणाही महिलेसोबत चुकीचं करणार नाही मग ती प्रसिद्ध असो किंवा नसो. मला कृपया लक्ष्य करु नका कारण मला खरोखर हे झेपत नाहीये आणि मला या सगळ्यातून जावं लागत आहे याचा मी विचारच करु शकत नाहीये. धन्यवाद."
आणखी एक स्टोरी शेअर करत ती लिहिते, "माझं मेन अकाऊंट रिपोर्ट केलं गेलं आणि तिच्या चाहत्यांनी ते ब्लॉक केलं. मी काय चुकीचं केलंय? उलट मी एका चीटरपासून तिला वाचवलंच आहे. कृपया माझ्यावर विश्वास ठेवा."

याशिवाय मेरीने व्हॉइस रेकॉर्डिंगही शेअर केलं. ती म्हणते, "मला का लक्ष्य केलं जातंय? नावं ठेवली जात आहेत? मी हे सगळं प्रसिद्धीसाठी केलेलं नाही. अख्खा देश जिच्याकडे कौतुकाने पाहतो तिच्यासोबत एक माणूस कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहे आणि तो मला भेटण्यासाठी मेसेज पाठवतोय. एक मुलगी जेव्हा हे चुकीचं वर्तन समोर आणते तेव्हा तिलाच कसं चुकीचं ठरवलं जातंय? मी त्याला पहिल्यांदा मेसेज केला नाही, फ्लर्ट केलं नाही मी फक्त त्याला रिप्लाय दिले. हे जर माझ्याबरोबर घडतंय तर आणखी कोणासोबतही होऊ शकतं. स्मृती मंधानावर संपूर्ण देशाचं प्रेम आहे हे मला माहित आहे. मीही तिचा आदर करते. पण याचा अर्थ हा नाही की मी त्याचा पर्दाफाश करणार नाही. मी कोणाचं नातं तोडलं नाही, मी कोणाच्याही बॉयफ्रेंडला अप्रोच केलेलं नाही. मला टार्गेट करु नका."