"त्याला कायम स्वतःच्या...", बॉलिवूड अभिनेत्रीचं सलमान खानबद्दल वक्तव्य, पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 15:26 IST2025-12-12T15:18:40+5:302025-12-12T15:26:03+5:30
बॉलिवूड अभिनेत्री सलमान खानबद्दल नेमकं काय म्हणाली?

"त्याला कायम स्वतःच्या...", बॉलिवूड अभिनेत्रीचं सलमान खानबद्दल वक्तव्य, पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर
Chitrangadha Singh: 'देसी बॉईज', 'इन्कार', 'बझार', 'हजारो ख्वाहिशे ऐसी', 'ये साली जिंदगी', 'बॉब बिस्वास' या सर्व चित्रपटांमधून आपल्या हॉट अंदाजाने लक्षवेधी ठरलेली अभिनेत्री म्हणजे चित्रांगदा सिंग.२००५ साली प्रदर्शित झालेल्या हजारो ख्वाहिशे ऐसी या चित्रपटातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. सध्या चित्रांगदा तिचा आगामी चित्रपट बॅटल ऑफ गलवान मुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. या चित्रपटात ती बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहे. याच दरम्यान, दिलेल्या एका मुलाखतीत चित्रांगदाने अभिनेता सलमान खानबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
चित्रागंदा आणि सलमान खान ही फ्रेश जोडी अपूर्व लाखिया दिग्दर्शित बॅटल ऑफ गलवान या महत्वाकांक्षी प्रोजेक्टमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. अलिकडेच अभिनेत्री चित्रांगदा सिंहने एका न्यूज एजंसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सलमानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. बॅटल ऑफ गलवान मध्ये चित्रांगदा सलमानच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. ती म्हणाली,"एक कलाकार म्हणून आपण जे स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं असतं तेच करत असतो. पण दिग्दर्शकाची आपल्याकडून काहीतरी वेगळं करण्याची अपेक्षा असते. सलमानसोबत काम करताना, काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळते. त्याला कायम स्वतःच्या शैलीत अभिनय करायला आवडतो, त्यामुळे सेटवर अनेक दृश्ये उत्साहाने कोणत्याही पूर्व नियोजनाशिवाय चित्रित करण्यात आली."
त्यानंतर चित्रांगदाने तिच्या चित्रपटातील भूमिकेबद्दल म्हटलं," ॲक्शन चित्रपटांमध्ये भावनिक दृश्यांची झालरही असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची भूमिका लहान असली तरी, तुम्ही त्यात आपली छाप सोडली पाहिजे. तुमचा रोल पाच मिनिटांचा का असेना पण जर तुम्ही उत्तम काम केलं तर लोक तुम्हाला कायम लक्षात ठेवतात, आणि हेच एका कलाकारासाठी गरजेच असतं."
'बॅटल ऑफ गलवान'सिनेमाबद्दल जाणून घ्या...
सलमान खान आणि चित्रांगदा सिंगचा हा चित्रपट २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चीन आणि भारताच्या सैनिकांमधील चकमकीवर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता कर्नल बी. संतोष बाबू यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अपूर्वा लाखिया यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर झालेली नाही. हा चित्रपट २०२६ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.