मिसेस मुख्यमंत्री बॉलिवूडमध्ये येणार? 'त्या' प्रश्नावर अमृता फडणवीस म्हणाल्या-"मी जन्मात कधी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 14:49 IST2025-12-05T14:43:56+5:302025-12-05T14:49:35+5:30

'मिसेस मुख्यमंत्री' अमृता फडणवीस बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार, म्हणाल्या-"त्या रस्त्याने मला…"

chief minister devendra fadnavis wife amruta fadanvis talk about her entry in bollywood | मिसेस मुख्यमंत्री बॉलिवूडमध्ये येणार? 'त्या' प्रश्नावर अमृता फडणवीस म्हणाल्या-"मी जन्मात कधी..."

मिसेस मुख्यमंत्री बॉलिवूडमध्ये येणार? 'त्या' प्रश्नावर अमृता फडणवीस म्हणाल्या-"मी जन्मात कधी..."

Amruta Fadanvis: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे त्यांच्या पत्नी अमृता या देखील कायम चर्चेत असतात. अमृता फडणवीस राजकीय क्षेत्रात नाहीतर मनोरंजन विश्वात प्रचंड सक्रिय आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी यापलीकडे एक गायिका म्हणून त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. गेल्या तीन-चार वर्षात त्यांचे अनेक म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सध्या अमृता फडणवीस एका मुलाखतीमुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

नुकतीच त्यांनी 'एबीपी माझा' च्या 'कॉफी विथ कौशिक' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांना, 'तुम्ही आजवर बरेच म्यूझिक अल्बम बनवले. पण, आम्ही तुम्हाला कुठल्याच बॉलिवूड चित्रपटामध्ये पाहिलं नाही, तुमची बॉलिवूडमध्ये येण्याची इच्छा आहे का?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत अमृता फडणवीस म्हणाल्या, "तुम्हाला वाटतं का मला अभिनय येतो? मी माझ्या स्वत:च्या गाण्यांमध्ये खूप रमलेली असते तेव्हा थोडाफार अभिनय करणं जमतं."

मग त्या म्हणाल्या, "पण, जर मनात राग असेल आणि समोर प्रेमाचा सीन करायचा असेल तर मी जन्मात कधी ते करू शकणार नाही. जे मी आत आहे तशीच मी बाहेर आहे. दुसरी गोष्ट माझ्याकडे चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. अनुपम खेरजी आणि काही दिग्दर्शक चित्रपटांच्या ऑफर्स घेऊन आले होते. पण, मी त्या ऑफर्स खूप प्रेमाने नाकारल्या. कारण, मला माहित आहे त्या रस्त्याने मला जायचं नाही."

अभिनय क्षेत्र एक वेगळंच प्रोफेशन…

"माझ्या हातात सध्या खूप काम आहे. एकीकडे माझं बॅंकेचं काम आहे. शिवाय घर सांभाळायचं आहे. तसंच मला रियाज आणि माझे म्यूझिक व्हिडीओज आहेत. तर दुसरीकडे माझं सामाजिक कार्य आहे ज्यासाठी मी वेगवेगळे प्रोजेक्ट्स लीड करते आहे ज्याचं काम माझ्या एनजीओ मार्फत चालतं. तर मला त्या कामात काहीही कमी होऊ द्यायची नाही. त्यामुळे वेळेची खूप टंचाई आहे. आणि अभिनय क्षेत्र एक वेगळंच प्रोफेशन आहे आणि मेहनतीचं आहे. जो या फिल्डमध्ये फिट असेल त्याने नक्कीच पुढे जावं. असं मत अमृता फडणवीस यांनी मुलाखतीत व्यक्त केलं. 

Web Title : अमृता फडणवीस बॉलीवुड में एंट्री पर: 'मैं कभी नहीं कर सकती'

Web Summary : अमृता फडणवीस ने स्पष्ट किया कि वे प्रस्तावों के बावजूद बॉलीवुड में शामिल नहीं हो रही हैं। वह बैंकिंग, परिवार, संगीत और सामाजिक कार्यों पर ध्यान केंद्रित कर रही हैं। अभिनय के लिए समर्पण चाहिए, जो फिलहाल उनके पास नहीं है, अनुपम खेर के प्रस्तावों के बावजूद।

Web Title : Amruta Fadnavis on Bollywood entry: 'I can never do it'

Web Summary : Amruta Fadnavis clarified she's not joining Bollywood despite offers. She's focused on banking, family, music, and social work. Acting requires dedication she can't currently commit to, despite Anupam Kher's offers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.