रस्त्यावर भरधाव बाईक चालवून केला धोकादायक स्टंट, बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:37 IST2025-10-31T18:36:03+5:302025-10-31T18:37:13+5:30
फिल्म प्रमोशनसाठी रस्त्यावर भरधाव वेगात बाईक चालवून केला स्टंट, बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्यावर गुन्हा दाखल

रस्त्यावर भरधाव बाईक चालवून केला धोकादायक स्टंट, बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्यावर गुन्हा दाखल
लोकप्रिय अभिनेते टिकू तलसानिया (Tiku Talsania) आणि अभिनेत्री मानसी पारेख हे त्यांच्या आगामी 'मिसरी' या गुजराती चित्रपटाच्या प्रमोशनमुळे अडचणीत आले आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी बाईकवर केलेला एक धोकादायक स्टंट चांगलाच व्हायरल झाला आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल अहमदाबाद पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नेमका काय आहे प्रकार?
'मिसरी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टिकू तलसानिया आणि मानसी पारेख यांनी अहमदाबादमधील एका रस्त्यावर रात्री बाईकवर स्टंट केला होता. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मानसी पारेख बाईकवर एका व्यक्तीच्या मागे उभी असलेली दिसतेय. तर टिकू तलसानिया बाईकवर उभं राहून, भरधाव वेगात बाईक चालवताना दिसत आहेत. यावेळी दोघांच्याही बाईकचा स्पीड खूप जास्त होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, अहमदाबादमधील वाहतूक पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक पद्धतीने बाईक चालवणे वाहतूक नियमांचे उल्लंघन असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Gujarati Actors Tiku Talsania, Mansi Parekh and others from upcoming film Misri are caught performing dangerous stunts on city roads during a promo rally in Ahmedabad
— Lakshay Mehta (@lakshaymehta08) October 30, 2025
Police register a case and begin legal action against those involved. pic.twitter.com/TujyuvUyAG
टिकू तलसानिया हे बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांनी 'देवदास', 'हंगामा' यांसारख्या गाजलेल्या हिंदी सिनेमात काम केलंय. लवकरच ते रणवीर सिंगच्या आगामी 'धुरंधर' सिनेमात दिसणार आहेत. टिकू आणि मानसी यांच्या 'मिसरी' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान हा धोकादायक स्टंट केल्याबद्दल टिकू तलसानिया यांनी अद्याप कोणीतीही प्रतिक्रिया दिली नाही. पोलीस त्यांच्यावर कोणती कारवाई करणार, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
