हम ये वादा तुटने नही देंगे! देशभक्तीचं स्फुरण जागवणारा 'बॉर्डर २'चा ट्रेलर; सनी देओलच्या जबरदस्त अभिनयाने जिंकलं मन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 18:38 IST2026-01-15T18:36:27+5:302026-01-15T18:38:54+5:30
Border 2 Movie Trailer: 'बॉर्डर २'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सनी देओलचा जबरदस्त अभिनय पाहून आणि थरारक दृश्य पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही

हम ये वादा तुटने नही देंगे! देशभक्तीचं स्फुरण जागवणारा 'बॉर्डर २'चा ट्रेलर; सनी देओलच्या जबरदस्त अभिनयाने जिंकलं मन
भारतीय सैन्यदिनाच्या मुहूर्तावर, 'बॉर्डर २'च्या निर्मात्यांनी या बहुप्रतिक्षित युद्धपटाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या ट्रेलरमुळे संपूर्ण देशात पुन्हा एकदा देशभक्तीची लाट उसळणार यात शंका नाही. भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला मानवंदना देणारा हा ट्रेलर २०२६ मधील बहुप्रतिक्षित सिनेमाचा ट्रेलर आहे. 'बॉर्डर २'चा ट्रेलर पाहून सर्वांमध्ये देशभक्तीचं स्फुरण जागृत होईल यात शंका नाही.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट आहे. भारताचे लष्कर (Army), नौदल (Navy) आणि वायुसेना (Air Force) जेव्हा एकत्र येतात, तेव्हा नक्की काय घडते याचा थरार प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या ट्रेलरची सुरुवात अंगावर शहारे आणणाऱ्या दृश्यांनी होते. सीमेवर लढणारे जवान, समुद्रावर वर्चस्व गाजवणारे नौदल आणि आकाशात झेपावणारी फायटर जेट्स यामुळे हा चित्रपट एक भव्य ॲक्शन सोहळा ठरणार आहे.
'बॉर्डर २'चा ट्रेलर पहा
कथेच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा सनी देओल असून त्यांचे खणखणीत संवाद आणि जबरदस्त अभिनय पाहून लोकांना १९९७ च्या 'बॉर्डर' सिनेमाची आठवण येत आहे. त्यांच्यासोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हे कलाकार भारतीय सैनिकांच्या आव्हानात्मक भूमिकेत दिसत आहेत. १९७१ च्या युद्धात भारताने पाहिलेल्या शौर्याच्या आणि बलिदानाच्या कथा या कलाकारांच्या माध्यमातून जिवंत केल्या गेल्या आहेत.
'बॉर्डर २'ची निर्मिती आणि प्रदर्शन गुलशन कुमार आणि टी-सीरीज प्रस्तुत, जे.पी. दत्ता यांच्या जे.पी. फिल्म्सच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, जे.पी. दत्ता आणि निधी दत्ता यांनी या चित्रपटाची धुरा सांभाळली असून अनुराग सिंग यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. देशभक्ती आणि साहसाची ही महागाथा २३ जानेवारी २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहात धडकणार आहे.