'बॉर्डर २' ने 'या' गाजलेल्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले! ७ दिवसांत केली इतकी कमाई, एकूण कलेक्शन तब्बल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 11:39 IST2026-01-30T11:36:34+5:302026-01-30T11:39:02+5:30

हिट की फुस्स? सनी देओलच्या 'बॉर्डर २'ने पहिल्याच आठवड्यात कमावले 'इतके'कोटी, मूळ बजेट किती होतं?

border 2 box office collection day 7 earn 224 crore in opening weekend has surprassed this film | 'बॉर्डर २' ने 'या' गाजलेल्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले! ७ दिवसांत केली इतकी कमाई, एकूण कलेक्शन तब्बल...

'बॉर्डर २' ने 'या' गाजलेल्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले! ७ दिवसांत केली इतकी कमाई, एकूण कलेक्शन तब्बल...

Border 2 Movie Collection Day 7: भारतीय सैन्याची शौर्यगाथा सांगणारा आणि प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीचं स्फुल्लिंग चेतवणारा 'बॉर्डर २' हा सिनेमा सध्या प्रचंड चर्चेत आहे. सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ या कलाकारांची भूमिका असलेला हा चित्रपट केवळ युद्धपट नाहीतर सीमेवर उभे राहून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांची कहाणी आहे.२३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास आठवडाभराचा कालावधी लोटला आहे. प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी चित्रपटाने किती  कमाई केली, याची आकडेवारी समोर आली आहे. 

दिग्दर्शक अनुराग सिंग यांच्या बॉर्डर २ सिनेमाची विक्रमाच्या दिशेने  घौडदौड सुरु असून पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने  २२४.२५ कोटींचा गल्ला जमवला आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने सातव्या दिवशी, म्हणजे मंगळवारी बॉक्स ऑफिसवर ११.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. 'बॉर्डर २' च्या आतापर्यंतच्या भारतातील  कमाईबद्दल बोलायचं झालं तर,'बॉर्डर २' ने पहिल्या आठवड्यातच दमदार कमाई केली आहे. दरम्यान, ही प्राथमिक आकडेवारी आहे , यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.पहिल्या ७ दिवसांत 'बॉर्डर २' पेक्षा कमी कमाई करणाऱ्या १० चित्रपटांबद्दल बोललो तर त्या यादीत 'धुरंधर', 'चावा', 'दंगल', 'बजरंगी भाईजान', 'सुल्तान' यासह अनेक चित्रपटांचा समावेश आहे. पहिल्याच आठवड्यात मोठी झेप घेत  'बॉर्डर-२' ने  या चित्रपटांचे रेकॉर्ड़स मोडले आहेत.

मिडिया रिपोर्टनुसार, सनी देओल आणि वरुण धवन यांच्या मल्टीस्टारर चित्रपट 'बॉर्डर २' चे बजेट सुमारे २५० कोटी रुपये इतकं आहे. अनुराग सिंग यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट  जे.पी. दत्ता यांच्या १९९७ च्या सुपरहिट चित्रपट 'बॉर्डर' चा सिक्वेल आहे. जुन्या चित्रपटाशी भावनिक नातं असलेल्या प्रेक्षकांसोबतच नवीन पिढीचीही या सिनेमाला तितकीच पसंती मिळताना दिसते आहे.

Web Title: border 2 box office collection day 7 earn 224 crore in opening weekend has surprassed this film