"हे जर माझ्या तावडीत सापडले ना तर..."; करण जोहरवर गोविंदा भडकला? स्पष्टच म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 15:59 IST2026-02-10T15:56:48+5:302026-02-10T15:59:57+5:30
बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटाच्या शीर्षकावरून गोविंदाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून तो करणवर प्रचंड भडकला आहे.

"हे जर माझ्या तावडीत सापडले ना तर..."; करण जोहरवर गोविंदा भडकला? स्पष्टच म्हणाला...
बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या 'गोविंदा नाम मेरा' (Govinda Naam Mera) या चित्रपटाच्या शीर्षकावरून गोविंदाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून तो करणवर प्रचंड भडकला आहे. अर्थात गोविंदाने करणचं थेट नाव घेतलं नसलं तरीही त्याचा रोख त्याच्याकडेच आहे. जाणून घ्या.
वादाचे मुख्य कारण काय?
२०२२ मध्ये करण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'ने विक्की कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेला 'गोविंदा नाम मेरा' हा चित्रपट प्रदर्शित केला होता. या चित्रपटाच्या नावासाठी आपल्या नावाचा वापर करण्यात आल्याचा दावा गोविंदाने केला आहे. एका मुलाखतीदरम्यान गोविंदाने या विषयावर आपले मौन सोडले आणि मनातली नाराजी व्यक्त केली.
गोविंदाने काय म्हटले?
मुलाखतीमध्ये गोविंदाने संताप व्यक्त करत म्हटले की, "कोणीतरी माझ्या नावाने चित्रपट बनवला - 'गोविंदा नाम मेरा'. मला वाटतं तो करण जोहरचा चित्रपट होता. त्या चित्रपटाचा विषय असा होता की, प्रेयसीसोबत काहीतरी घोळ होतो आणि पती-पत्नीमध्ये पळापळ सुरू होते. मग पत्नी पतीवर संशय घेते आणि पती पत्नीवर. तर हे लोक अशीच एखादी गोष्ट वैयक्तिक आयुष्यात घुसवण्याचा प्रयत्न करतात.''
गोविंदा शेवटी म्हणाला, ''जर कधी हे माझ्या तावडीत सापडले... तर आदरणीय रजनीकांत यांच्या शैलीत मी त्यांना सर्वांसमोर इतका 'प्रसाद' देईन आणि तोही भर सभेत देईन." अशाप्रकारे गोविंदाने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. करणचं थेट नाव घेतलं नसलं तरीही गोविंदाच्या मनातील नाराजी स्पष्टपणे जाणवली. गोविंदा सध्या आर्थिक संकटात असल्याची चर्चा आहे. इतका मोठा सुपरस्टार असूनही अनेक स्थानिक कार्यक्रमांमध्ये तो डान्स करताना दिसतो. याशिवाय अलीकडे गोविंदा स्वतःची गाडी सोडून कॅबने फिरताना दिसला. परंतु यावर गोविंदा किंवा त्याच्या टीमने कोणतंही प्रत्युत्तर दिलं नाही.