Valentine's Dayला शरद केळकर झाला रोमॅण्टिक; पत्नीसाठी लिहिली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 14:16 IST2022-02-14T14:16:08+5:302022-02-14T14:16:52+5:30
Sharad kelkar: शरदच्या पत्नीचं नाव किर्ती केळकर आहे. शरदप्रमाणेच ती देखील सोशल मीडियावर सक्रीय असते. त्यामुळे तिच्या नावाचीही नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगत असते.

Valentine's Dayला शरद केळकर झाला रोमॅण्टिक; पत्नीसाठी लिहिली खास पोस्ट
मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारा अभिनेता म्हणजे शरद केळकर. 'आक्रोश' या मालिकेपासून करिअरची सुरुवात करणारा शरद आज कलाविश्वातील दिग्गज अभिनेता म्हणून ओळखला जातो. 'लय भारी', 'रामलीला', 'मोहन्जेंदडो', 'भूमी', 'हाऊसफुल्ल-4' अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकलेला शरद त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतो. यात अनेकदा त्याच्या पत्नीची आणि लेकीची चर्चा होत असते.
आज (१४ फेब्रुवारी) व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने शरदने त्याच्या पत्नीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने पत्नीसोबत एक रोमॅण्टिक फोटो शेअर केला असून या फोटोला दिलेलं कॅप्शन अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
'हा फक्त वर्षातला एक दिवस आहे. पण तुलाही माहितीये की, मी प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला फक्त तुझ्यावरच प्रेम करतो', अशी पोस्ट शरदने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. विशेष म्हणजे शरद अनेकदा त्याच्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो. मात्र, आज शेअर केलेला फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान, शरदच्या पत्नीचं नाव किर्ती केळकर आहे. शरदप्रमाणेच ती देखील सोशल मीडियावर सक्रीय असते. त्यामुळे तिच्या नावाचीही नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगत असते. शरद मुळचा मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा आहे. त्याचं संपूर्ण शिक्षण ग्वाल्हेरमध्येच झालं आहे. कलाविश्वात येण्यापूर्वी तो स्पोर्ट्स टीचर म्हणून काम करायचा.