'रामलीला'मध्ये लीलाच्या भूमिकेत दिसली असती 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; का सोडलेला सुपरहिट चित्रपट? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 12:35 IST2025-01-05T12:32:35+5:302025-01-05T12:35:29+5:30

'गोलियों की रासलीला: रामलीला' हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता.

bollywood sanjay leela bhansali superhit movie ram leela kareena kapoor was frist choice before deepika padukone | 'रामलीला'मध्ये लीलाच्या भूमिकेत दिसली असती 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; का सोडलेला सुपरहिट चित्रपट? जाणून घ्या

'रामलीला'मध्ये लीलाच्या भूमिकेत दिसली असती 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; का सोडलेला सुपरहिट चित्रपट? जाणून घ्या

Ram Leela Movie: 'गोलियों की रासलीला: रामलीला' हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील दीपवीरची केमिस्ट्री प्रेक्षकांना भलतीच आवडली होती. पण, 'रामलीला' सिनेमासाठी दीपिका पदुकोण पहिली पसंत नव्हती. तर लीला च्या भूमिकेसाठी अभिनेत्री करिना कपूर संजय लीला भन्साळी यांची पहिली पसंत होती. खुद्द रणवीरनेच 'कॉफी विथ करण'मध्ये याचा खुलासा केला होता.

'कॉफी विथ करण'मध्ये अभिनेता रणवीर सिंगने 'रामलीला' चित्रपटातील कास्टिंगचा किस्सा शेअर केला. त्यादरम्यान अभिनेता म्हणाला, "दीपिका पादुकोण 'रामलीला'साठी पहिली पसंत नव्हती. दीपिकापूर्वी या चित्रपटासाठी करिना कपूरला कास्ट करण्यात आलं होतं. पण, रामलीलाचं शूट सुरु करण्याआधीच करीनाने चित्रपटात काम करण्यास नकार दिला. त्यामुळे संजय लीला भन्साळी यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला होता." 

पुढे अभिनेत्याने सांगितलं की, "मग चित्रपटात आता करीनाच्या जागी कोणत्या अभिनेत्रीला कास्ट करावं? या विचारात सगळे पडले होते. त्याचदरम्यान मी दीपिकाचं नाव सूचवलं. त्यावेळी तिचा 'कॉकटेल' सिनेमा नुकताच रिलीज झाला होता. अशा पद्धतीने 'रामलीला'मध्ये दीपिकाची एन्ट्री झाली."

दरम्यान, रणवीर-दीपिकाच्या अभिनयाने 'रामलीला' चित्रपटामध्ये चार चॉंद लावले. चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. 

Web Title: bollywood sanjay leela bhansali superhit movie ram leela kareena kapoor was frist choice before deepika padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.