सनी देओलच्या बहुचर्चित 'बॉर्डर-२' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात; सेटवरील पहिला फोटो आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:26 IST2024-12-24T16:23:37+5:302024-12-24T16:26:11+5:30
सध्या बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर' या मल्टीस्टारर सिनेमाच्या सीक्वलची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

सनी देओलच्या बहुचर्चित 'बॉर्डर-२' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात; सेटवरील पहिला फोटो आला समोर
Border-2 Movie: सध्या बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर' या मल्टीस्टारर सिनेमाच्या सीक्वलची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अभिनेता सनी देओल(Sunny Deol), सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना अशा तगड्या कलाकारांची फळी या सिनेमात पाहायला मिळाली. 'बॉर्डर' हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला. आता तब्बल २७ वर्षांनी या सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे 'बॉर्डर-२' बद्दल सिनेरसिकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, नुकतीच या चित्रपटाच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. 'बॉर्डर-२' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.
'T-Series'द्वारे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती देण्यात आली आहे. या फोटोमध्ये युद्धातील रणगाडे दिसत आहेत. त्यासोबत एका व्यक्तीने हातात क्लिबोर्ड पकडलेला पाहायला मिळतोय. ज्यामध्ये सीन नंबर १७, शॉट नं-२८ आणि टेक नं-४ असं लिहिलं आहे. त्याचबरोबर 'T-Series' ने शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'बॉर्डर-२' च्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. सनी देओल , वरुण धवन(Varun Dhwan), दिलजीत दोसांझसह (Diljit Dosanjh)अहान शेट्टी सिनेसृष्टीमधील दिग्गज भूषण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाच्या सीक्वलच्या दिग्दर्शनाची धुरा अनुराग सिंग यांच्यावर आहे. देशप्रेमाची भावना करणारा 'बॉर्डर-२' येत्या २३ जानेवारी २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जवळपास २७ वर्षांनंतर ‘बॉर्डर २’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. पण या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा जेपी दत्ता नाही तर अनुराग सिंह सांभाळणार आहेत. अनुराग सिंह यांनी याआधी अक्षय कुमारचा 'केसरी','पंजाब १९८४' आणि 'जट अँड जुलियट' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.