अबब! स्टेज परफॉर्मन्सची फी ७ कोटी; उर्वशी रौतेला बनली सर्वाधिक मानधन घेणारी परफॉर्मिंग आर्टिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:21 IST2025-01-03T11:15:40+5:302025-01-03T11:21:11+5:30
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच उर्वशी रौतेला झाली करोडपती! डान्स परफॉर्मन्ससाठी घेतलं तब्बल इतक्या कोटींचं मानधन

अबब! स्टेज परफॉर्मन्सची फी ७ कोटी; उर्वशी रौतेला बनली सर्वाधिक मानधन घेणारी परफॉर्मिंग आर्टिस्ट
Urvashi Rautela : नववर्ष २०२५ हे अनेकांसाठी खास ठरलं आहे. या नवीन वर्षाचं सर्वानीच मोठ्या आनंदात, जल्लोषात स्वागत केलं. सर्वसामान्यांसह कलाकार मंडळींनीही आपआपल्या पद्धतीने नव्या वर्षात जंगी सेलिब्रेशन केलं. परंतु अभिनेत्री उर्वषी रौतेलासाठी नवीन वर्ष रेकॉर्ड ब्रेक करणारं ठरलं. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका न्यू इयर सेलिब्रेशनमध्ये स्टेज परफॉर्म करण्यासाठी अभिनेत्रीने कोटींच्या घरात मानधन घेतल्याचं सांगितलं जातंय.
आपली उत्कृष्ट नृत्यशैली आणि अदाकारीमुळे उर्वशी रौतेला जगभरात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरही तिची तगडी फॅनफॉलोइंग आहे. पण, उर्वशी सध्या तिच्या एका स्टेज परफॉर्मन्समुळे चर्चेत आली आहे. अगदी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोलकाता येथील न्यू इयर कॉन्सर्टमध्ये स्टेज परफॉर्मन्ससाठी अभिनेत्रीने चांगलीच फी घेतली.या कॉन्सर्टमध्ये तिने 'स्त्री-२ 'मधील 'आज की रात' गाण्यावर जबरदस्त डान्स केला. तिच्या या स्टेज परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उर्वशी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये स्टेजवर डान्स करताना दिसते आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, उर्वशीने या गाण्यासाठी ७ कोटी रुपये इतकं मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे. तमन्ना भाटियाने 'स्त्री-२' मधील गाण्यासाठी जितकं मानधन घेतलं त्यापेक्षाही जास्त फी अभिनेत्रीने या स्टेज परफॉर्मन्ससाठी आकारली आहे. मात्र, तमन्ना भाटियाने या आयटम सॉंगसाठी १ कोटी रुपये इतकं मानधन घेतलं होतं. पण, आता एक परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून उर्वशी रौतेलाच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे.
उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती नंदमुरी बाळकृष्ण यांच्या 'एनबीके १०९' मध्ये बॉबी देओलसोबत काम करताना दिसणार आहे. त्याचबरोबर आफताब आणि जस्सी गिल यांच्या 'कसूर' चित्रपटामध्येही दिसण्याची शक्यता आहे.