ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 16:48 IST2026-01-12T16:45:16+5:302026-01-12T16:48:29+5:30
ठाकरेंचा प्रचार करण्यासाठी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे

ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार
सध्या महानगरपालिकेची रणधुमाळी सुरु आहे. विविध ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते आपल्या लाडक्या पक्षासाठी प्रचार करत आहेत. या महानगरपालिका निवडणुकीत दोन भाऊ एकत्र आले आहेत. अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत युती केली आहे. अशातच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ठाकरे सेनेचा प्रचार करण्यासाठी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे रवीना टंडन. एका व्हिडीओत रवीना टंडन खांद्यावर भगवं उपरणं घेऊन ठाकरे गटातील उमेदवाराचा प्रचार करताना दिसतेय. रवीना गल्लोगल्ली जाऊन लोकांच्या दारात उभी राहून निवडणुकीत ठाकरेंच्या मशालीचं चिन्हाबद्दल लोकांना जागरुक करताना दिसत आहे. रवीना टंडनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांना मात्र ठाकरे गटासाठी रवीना करत असलेला प्रचार पाहून आश्चर्याचा धक्काही बसला आहे.
रवीना आल्याचं कळताच आजूबाजूची लोक रवीनाला आनंदाने भेटत आहेत. रवीनाही सर्वांच्या अभिवादनाचा स्वीकार करताना दिसत आहे. रवीना ठाकरे गटाच्या कोणत्या उमेदवाराचा, कोणत्या भागात प्रचार करतेय, याविषयी निश्चित माहिती कळाली नाही. पण तरीही सुप्रसिद्ध बॉलिवूड रवीना टंडनने ठाकरेंची मशाल हाती घेतल्याने निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला याचा नक्कीच फायदा होईल, यात शंका नाही.