"प्रत्येक वेळी सावध...", करिश्माने सांगितला गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव,'तो' प्रसंग शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 16:26 IST2025-08-23T16:18:45+5:302025-08-23T16:26:14+5:30

करिश्माने सांगितला गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव,'तो' प्रसंग शेअर करत म्हणाली...

bollywood actress karishma kapoor once talk in interview about working experience with govinda | "प्रत्येक वेळी सावध...", करिश्माने सांगितला गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव,'तो' प्रसंग शेअर करत म्हणाली...

"प्रत्येक वेळी सावध...", करिश्माने सांगितला गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव,'तो' प्रसंग शेअर करत म्हणाली...

Karishma Kapoor : ९० दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने जादूने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर.'राजा हिंदुस्तानी','हम साथ साथ हैं' और 'हीरो नंबर 1','राजा बाबू','बीवी नंबर 1' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून तिने अभिनयाचा ठसा उमटवला.करिश्माने तिच्या करिअरमध्ये इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे.परंतु ,गोविंदासोबत तिची चांगली जोडी जमली. या जोडीला प्रेक्षकांचीही तितकीच पसंती मिळाली. त्याकाळी  या जोडीनं एक दोन नाही तर तब्बल ११ सिनेमांत एकत्र काम केलं.मात्र, अचानक तिने गोविंदासोबत काम करणं बंद केलं. यामागे काय कारण होतं याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला होता. 

एका इव्हेंटमध्ये अभिनेत्री करिश्मा कपूरने तिच्या करिअरबद्दल भाष्य करत आठवणींना उजाळा दिला. त्यादरम्यान ती म्हणाली होती की, "मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला बॉलिवूडच्या तिन्ही खानसोबत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तो काळ आमच्या करिअरला उभारणी देणारा होता.आमिर, शाहरुख खान आणि अगदी गोविंदासह सर्व कलाकार यांची काम करण्याची पद्धत फार वेगळी आहे. मी प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला."

त्यानंतर करिश्माने सांगितलं,"आमिरच्या बाबतीत बोलायचं झालं तर तो प्रत्येक गोष्ट करताना तो खूप सावध असतो. तो खूप रिहर्सल करतो.तर सलमान या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. तो जे काही करतो त्यातून काहीतरी छानच घडतं. शिवाय शाहरुख त्याच्या सहकलाकारांची नेहमीच काळजी घेतो.पण, गोविंदासोबत काम करताना मी प्रत्येक वेळी सावध असायचे. कारण, गोविंदा एक उत्तम अभिनेते आहेत शिवाय उत्तम डान्सर सुद्धा आहेत,  त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना खूप कम्फर्टेबल वाटायचं."

मी गोविंदाची फॅन होते...

त्यानंतर अभिनेत्री एका प्रसंगाविषयी सांगत म्हणाली, "मी गोविंदाची मोठी चाहती होते.'खुदगर्ज' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान माझी त्यांच्यासोबत भेट झाली. त्यावेळी नीलम कोठारी डान्स करत आहे, असा तो सीन होता.तेव्हा तुम्ही मला तिकडे घेऊन जाणार का असा हट्ट मी गोविंदाकडे केला होता.तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं आणि मी पूर्णपणे हरवून गेले होते."असा खुलासा अभिनेत्रीने केला. 

Web Title: bollywood actress karishma kapoor once talk in interview about working experience with govinda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.