'द डर्टी पिक्चर'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' बॉलिवूड सुंदरी; एक चूक झाली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 15:27 IST2025-10-06T15:18:08+5:302025-10-06T15:27:21+5:30
...तर 'द डर्टी पिक्चर'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, पण...

'द डर्टी पिक्चर'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' बॉलिवूड सुंदरी; एक चूक झाली अन्...
Vidya Balan :बॉलिवूडच्या लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये विद्या बालनचं ना आवर्जून घेतलं जातं. विद्याने तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. पण, २०११ मध्ये आलेल्या 'द डर्टी पिक्चर' मुळे तिची सगळीकडे चर्चा झाली. सुरुवातीला या चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रचंड विरोध झाला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. या चित्रपट विद्या बालनच्या करिअरसाठी मैलाचा दगड ठरला. चित्रपटातील तिच्या अभिनय पाहून सगळेच थक्क झाले होते. पण, तुम्हाला माहितीये का 'द डर्टी पिक्चर' मधील सिल्कची भूमिका सुरुवातीला दुसऱ्या एका बॉलिवूड अभिनेत्रीला ऑफर करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव तिने ही ऑफर नाकारली.
मिडिया रिपोर्टनुसार, साऊथ अॅक्ट्रेस सिल्क स्मिताच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा विद्या बालनआधी बॉलिवुडची धाकड गर्ल, कंगना राणौतला ऑफर केला गेला होता.असं म्हटलं जातं ती, या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर कंगनाने या चित्रपटास नकार दिला होता.कंगना राणौतने स्वतः देखील याबाबत खुलासा केला आहे.
'द डर्टी पिक्चर'चे दिग्दर्शन मिलन लुथरिया यांनी केलं आहे आणि त्याची पटकथा रजत अरोरा यांनी लिहिली आहे. या चित्रपटात विद्या बालन सोबत इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह आणि तुषार कपूर यांच्या भूमिका आहेत.'द डर्टी पिक्चर' हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला. फक्त १८ कोटी रुपये बजेट असलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर त्याने ११७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. विद्या बालनच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी हा एक आहे.