मुंबईतील १०० वर्ष जुन्या घरात राहते 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, फराह खानचा कूक दिलीप बघतच राहिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:03 IST2025-10-28T16:58:46+5:302025-10-28T17:03:01+5:30
फराह खान नुकतीच एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरात गेली होती. त्यावेळी घराचं डिझाईन आणि भव्यता बघून फराहचा कूक दिलीप थक्क झाला

मुंबईतील १०० वर्ष जुन्या घरात राहते 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, फराह खानचा कूक दिलीप बघतच राहिला
प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानबॉलिवूडमधील विविध सेलिब्रिटींसोबत व्लॉग शेअर करता दिसते. यात फराहसोबत तिचा कूक दिलीपही असते. नुकतंच फराहने एक व्लॉग शेअर केलाय. यात तिच्यासोबत अभिनेत्री डायना पेंटी (Diana Penty) पाहायला मिळतेय. विशेष म्हणजे फराहने डायनाच्या मुंबईतील १०० वर्षांपेक्षा जुन्या वडिलोपार्जित घराला भेट दिली आहे. या भेटीदरम्यान, घराचा भव्यपणा पाहून फराह खान खूप प्रभावित झालेली दिसली.
फराह जेव्हा डायनाच्या घरी आली तेव्हा तिने तिच्या घराची थेट तुलना बकिंगहॅम पॅलेस आणि शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याशी केली. डायनाच्या प्रशस्त हवेलीत प्रवेश करण्यापूर्वी, फराह खानने गंमत म्हणून तिचा कूक दिलीपला सांगितलं की, हे घर म्हणजे बकिंगहॅम पॅलेस आहे. याशिवाय डायनाला भेटल्यावर फराहने अभिनेत्रीची ओळख 'लेडी डायना' अशी करून दिली.
या घराचं सौंदर्य आणि घराचं डिझाईन पाहून फराह खूपच प्रभावित झाली. डायनाची आई नोरिन यांनी सांगितलं की, घरात असलेलं काही कोरीव लाकडी फर्निचर १०० वर्षांपेक्षा जुनं आहे आणि हे घर चार पिढ्यांपासून त्यांच्या कुटुंबाकडे आहे. घराचा भव्य आकार पाहून फराह खान म्हणाली, "लोखंडवालामध्ये डान्स स्टुडिओजसुद्धा इतके मोठे नसतात. हा हॉल 'मन्नत'मधील हॉल इतकाच मोठा आहे. मला वाटतं की तू शाहरुखला इथे बोलावलं पाहिजे." यावर डायनानेही उत्साह दाखवत, "मला नक्कीच आवडेल की शाहरुख माझ्या घरी यावा," असे म्हटले.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
फराह खानच्या या व्हीलॉगनंतर सोशल मीडियावर डायना पेंटीच्या घराची खूप चर्चा झाली. अनेक युजर्सनी घराच्या भव्यतेचं कौतुक केलं. एका युजरने प्रतिक्रिया दिली की, "डायनाचे घर तिच्याइतकेच सुंदर आहे." तर दुसऱ्याने लिहिलं, "बापरे! डायनाचे घर कोणत्याही सेलिब्रेटीच्या घरापेक्षा खूप सुंदर आहे. खूप भव्य आणि विंटेज!" विशेष गोष्ट म्हणजे, शाहरुख खान आणि डायना पेंटी या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजेच २ नोव्हेंबरला असतो.