मुलीच्या जन्मानंतर महिनाभरातच कामावर परतली दीपिका पादुकोण; पहिली जाहिरात केली शूट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 11:14 IST2024-10-16T11:08:59+5:302024-10-16T11:14:15+5:30

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग(Ranveer Singh) यांना 8 सप्टेंबर रोजी मुलगी झाली.

bollywood actress deepika padukone returns to work within a month after the birth of her daughter video viral on social media | मुलीच्या जन्मानंतर महिनाभरातच कामावर परतली दीपिका पादुकोण; पहिली जाहिरात केली शूट 

मुलीच्या जन्मानंतर महिनाभरातच कामावर परतली दीपिका पादुकोण; पहिली जाहिरात केली शूट 

Deepika Padukon: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone)  आणि रणवीर सिंग(Ranveer Singh) यांना 8 सप्टेंबर रोजी मुलगी झाली. दीपिका आणि रणवीर सिंह लग्नानंतर सहा वर्षांनी आई-बाबा झाले.अशातच डिलीव्हरीनंतर महिनाभरातच दीपिका पादुकोण  पुन्हा नव्या जोमाने कामाला लागली आहे. या प्रोजेक्टमध्ये अभिनेत्रीसोबत रणवीर सिंग देखील पाहायला मिळतो आहे. 


नुकताच रणवीर सिंगने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये दोघे पती-पत्नी एका प्रोजेक्टसाठी एकत्र काम करताना दिसत आहेत. आई झाल्यानंतर दीपिकाने एक जाहिरातीसाठी शूट केलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून दीपिकाचे चाहते प्रचंड खुश आहेत. शिवाय नेटकऱ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील केल्याचं पाहायला मिळतंय.

अभिनेत्री दीपिका पादुकोण  8 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला.अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता रणवीर सिंग  यांच्या घरी लग्नानंतर सहा वर्षांनी चिमुकलीचं आगमन झालं आहे. दीपिका पादुकोणच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची प्रभास व अमिताभ बच्चन यांच्यासह 'कल्की 2898 एडी'मध्ये झळकली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिवसर जबरदस्त कमाई केली. 'सिंघम अगेन' हा तिचा आगामी चित्रपट आहे. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होईल.

Web Title: bollywood actress deepika padukone returns to work within a month after the birth of her daughter video viral on social media