शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात कॅमिओ करणार 'ही' लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री; कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 09:16 IST2025-05-17T09:13:50+5:302025-05-17T09:16:50+5:30

'किंग' चित्रपटात 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री; १९ वर्षानंतर शाहरुखसोबत शेअर करणार स्क्रीन

bollywood actor shahrukh khan king movie update actress rani mukerji will join star cast says report | शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात कॅमिओ करणार 'ही' लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री; कोण आहे ती?

शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात कॅमिओ करणार 'ही' लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री; कोण आहे ती?

King Movie: अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan)  हा त्याच्या कायमच त्याच्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. सध्या शाहरुख त्याचा आगामी चित्रपट किंग मुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातून तो लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, नुकतीच या चित्रपटासंदर्भात एक महत्वाची माहिती समोर येते आहे. नायक, खलनायकाच्या नावावरून पडदा हटवल्यानंतर 'किंग' मध्ये आता आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी (Rani Mukerji) आहे. जवळपास १९ वर्षानंतर राणी मुखर्जी आणि शाहरुख पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. 

दरम्यान, बहुचर्चित किंग चित्रपटात शाहरुख खानसह सुहाना खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, अभय वर्मा, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि अर्शद वारसी हे कलाकार सुद्धा पाहायला मिळणार आहेत.पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, राणी मुखर्जी शाहरुख खानच्या किंगमध्ये दिसणार आहे. राणी मुखर्जी चित्रपटात कॅमिओ करणार आहे. परंतु तिची ही भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे. जवळपास १९ वर्षानंतर बॉलिवूडची ही लोकप्रिय जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आता प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. परंतु याबाबत चित्रपटाचे निर्माते किंवा कलाकरांनी देखील कोणताही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

राणी मुखर्जी-शाहरुख खानचे गाजलेले चित्रपट

राणी मुखर्जी आणि शाहरुख खान यांनी 'कुछ कुछ होता है', 'चलते चलते', 'पहेली', 'कभी खुशी कभी गम', 'वीर-जारा' आणि 'कभी अलविदा ना कहना' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. त्याचबरोबर 'कभी अलविदा ना कहना' या चित्रपटात ते शेवटचे एकत्र दिसले. आता १९ वर्षांनंतर पुन्हा ही जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. 

'किंग'ची कहाणी ही बदल्यावर आधारित असणार आहे. २००० साली बॉबी देओल आणि राणी मुखर्जीचा 'बिच्छू' सिनेमा आला होता. जो फ्रेंच सिनेमा 'लियोन:द प्रोफेशनल' चा रिमेक होता. 'किंग'ही असाच असणार आहे ज्यात शाहरुखही ग्रे भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. 

Web Title: bollywood actor shahrukh khan king movie update actress rani mukerji will join star cast says report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.