दीपिकाच्या हिल्स घातल्या का? अतरंग फॅशनमुळे रणवीर सिंग पुन्हा एकदा ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 16:15 IST2024-05-09T16:11:43+5:302024-05-09T16:15:00+5:30
Ranveer singh: अलिकडेच रणवीरने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्याच्या एकंदरीत लूकचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं. मात्र, त्याच्या शूजवर लोकांची नजर गेल्यानंतर त्यांनी त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.

दीपिकाच्या हिल्स घातल्या का? अतरंग फॅशनमुळे रणवीर सिंग पुन्हा एकदा ट्रोल
आपल्या अतरंगी स्टाइल स्टेटमेंटमुळे कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे रणवीर सिंग (ranveer singh). अभिनय कौशल्यापेक्षा रणवीर त्याच्या चित्रविचित्र फॅशनमुळे चर्चेत येत असतो. यात अनेकदा त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागलो. यात पुन्हा एकदा रणवीर चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या शूजमुळे त्याला लोकांनी ट्रोल केलं आहे.
अलिकडेच रणवीरने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी रेडकार्पेटवर तो पापाराझींना फोटोसाठी पोझ देत होता. विशेष म्हणजे यावेळी त्याच्या एकंदरीत लूकचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं. मात्र, त्याच्या शूजवर लोकांची नजर गेल्यानंतर त्यांनी रणवीरची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. दीपिकाचे हिल्स घालून आलास का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी त्याला विचारला.
सोशल मीडियावर रणवीरचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ विरेंद्र चावला यांनी त्यांच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रणवीरने पांढऱ्या रंगाचा स्टायलिश लूक केला होता. सोबतच त्याला मॅच होणारे पांढऱ्या रंगाचे शूज घातले होते. मात्र, हे शूज हुबेहूब हिल्ससारखे दिसत असल्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
दरम्यान, रणवीरची ट्रोल होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही तो त्याच्या शूजमुळे ट्रोल झाला होता. यापूर्वी त्याने हील बूट्स घातले होते. तेव्हाही त्याची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली होती.