राजकुमार रावच्या 'मालिक' सिनेमासाठी चाहत्यांना करावी लागणार मोठी प्रतीक्षा, जाणून घ्या यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 15:30 IST2025-04-25T15:20:35+5:302025-04-25T15:30:35+5:30

बहुचर्चित 'मालिक' सिनेमासाठी चाहत्यांना करावी लागणार मोठी प्रतीक्षा, काय आहे कारण

bollywood actor rajkummar rao thriller maalik movie release date postponed know the reason | राजकुमार रावच्या 'मालिक' सिनेमासाठी चाहत्यांना करावी लागणार मोठी प्रतीक्षा, जाणून घ्या यामागचं कारण

राजकुमार रावच्या 'मालिक' सिनेमासाठी चाहत्यांना करावी लागणार मोठी प्रतीक्षा, जाणून घ्या यामागचं कारण

Rajkumar Rao Malik Movie: बॉलिवूड इंडस्ट्रीला एकामागोमाग सुपरहिट सिनेमे देऊन अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) प्रसिद्धीझोतात आला. वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम करुन आपल्या दमदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. लवकरच राजकुमार राव 'मालिक' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, अशातच या चित्रपटाच्या संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. 'मालिक' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मुळ तारखेत बदल करण्यात आला आहे. याची माहिती खुद्द अभिनेता राजकुमार रावने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. 


बहुचर्चित 'मालिक' हा चित्रपट २० जून २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार होता. त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ११ जुलै करण्यात आली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे चित्रपट ११ जुलैला प्रदर्शित होणार आहे. यासंबंधित राजकुमार रावने 'मालिक' चित्रपटातील त्याची पोस्टरचा एक फोटो शेअर केला आहे."रौब, रुतबा, और राज होगा मालिक का, 11 जुलाई से आ रहें है मालिक ११ जुलै से सिनेमाघरों में...",अशी पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यामुळे आता राजकुमार रावच्या चाहत्यांना 'मालिक' चित्रपटासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

राजकुमार राव यांच्या 'मालिक' चित्रपटाची कथा सामाजिक मुद्द्यांवर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. मालिकमध्ये तो एका पहिल्यांदाच गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. 'मालिक'मध्ये राजकुमार रावसह अभिनेत्री मेधा शंकर, मानुृषी छिल्लर आणि ऋषी राज भसीन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा बहुचर्चित चित्रपत टिप्स फिल्म्सच्या बॅनरखाली बनत असून पुलकित यांनी 'मालिक'च्या दिग्दर्शनाच्या धुरा सांभाळली आहे. 

Web Title: bollywood actor rajkummar rao thriller maalik movie release date postponed know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.