भूमिकेसाठी कायपण! ५० दिवस केली नाही अंघोळ ना कापले केस; अभिनेत्याला पाहून घाबरायचे लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 17:34 IST2025-08-23T17:31:18+5:302025-08-23T17:34:01+5:30

५० दिवस केली नाही अंघोळ ना कापले केस; अभिनेत्याला पाहून घाबरायचे लोक, वाचा किस्सा

bollywood actor mukesh tiwari did not took bath for 50 days for china gate movie to get into villain role | भूमिकेसाठी कायपण! ५० दिवस केली नाही अंघोळ ना कापले केस; अभिनेत्याला पाहून घाबरायचे लोक

भूमिकेसाठी कायपण! ५० दिवस केली नाही अंघोळ ना कापले केस; अभिनेत्याला पाहून घाबरायचे लोक

Mukesh Tiwari: चित्रपटसृष्टीतील कलावंतांची लोकप्रियता पाहिली की आपल्याला आश्‍चर्यचकित व्हायला होते.असाच एक अभिनेता ज्याने बॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण केलं. या अभिनेत्याचं नाव म्हणजे मुकेश तिवारी. मालिका ते चित्रपट असा प्रवास करणारा हा अभिनेता लाखो-करोडो प्रेक्षकांचा आवडता बनला. मुकेश तिवारीने गंगाजल,गोलमाल यांसारख्या चित्रपटांतील व्यक्तिरेखांमुळे प्रसिद्धीझोतात आलेला हा अभिनेत्याची एका चित्रपटाची खूप चर्चा रंगली होती. त्या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्याने तब्बल ५० दिवस आंघोळ केली नव्हती.

राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'चायना गेट' हा चित्रपट १९९८ साली प्रदर्शित झाला होता. अमरीश पुरी, ओम पुरी, नसिरुद्दीन शाह, कुलभूषण खरबंदा, डॅनी, परेश रावल, टीनू आनंद, जगदीप विजू खोटे, ममता कुलकर्णी असे अनेक कलाकार या चित्रपटात असूनही मुकेश तिवारीने साकारलेला जगिरा भाव खाऊन गेला होता. खलनायकाने साकारुन या नायकाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं.'मेरे मन को भाया, मैं कुत्ता काटकर खाया' मुकेश तिवारी यांचा चित्रपटातील डायलॉग आजही अनेकांच्या ओठांवर आहे.

अभिनयात गब्बरला दिली टक्कर...

'चायना गेट' या चित्रपटात मुकेश तिवारीने ज्या पद्धतीने जगिराची भूमिका निभावली ती पाहून प्रेक्षकांना शोलेमधील गब्बरची आठवण झाली होती. विशेष म्हणजे या चित्रपटातून मुकेश यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली. जगिराच्या भूमिकेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. हे पात्र अधिक वास्तववादी दिसावं म्हणून त्यांनी जवळपास ५० दिवस आंघोळच केली नव्हती. शिवाय आपला लूक भयावह वाटावा यासाठी त्यांनी केसही कापले नव्हते. त्यामुळे लोक त्यांना पाहून घाबरून पळून जायचे.  याबद्दल एका मुलाखतीत मुकेश तिवारी यांनी स्वत खुलासा केला होता.

Web Title: bollywood actor mukesh tiwari did not took bath for 50 days for china gate movie to get into villain role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.