डेब्यू ठरला सक्सेसफूल! अनेक सुपरहिट चित्रपट दिले अन् गायब झाला 'हा' अभिनेता; १० वर्षांनी करतोय कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:43 IST2025-11-06T11:39:25+5:302025-11-06T11:43:51+5:30
तब्बल १० वर्षानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय 'हा' अभिनेता, सोबतीला आहे बॉलिवूड सुंदरी

डेब्यू ठरला सक्सेसफूल! अनेक सुपरहिट चित्रपट दिले अन् गायब झाला 'हा' अभिनेता; १० वर्षांनी करतोय कमबॅक
Imran Khan: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्सनिस्ट अभिनेता आमिर खानचा भाचा इमरान खान बरीच वर्षे अभिनयापासून दूर आहे. इमरान खानने जाने तू या जाने ना या २००८ साली आलेल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.या चित्रपटाने इमरानला रातोरात स्टार बनवलं. त्यानंतर अभिनेत्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र,गेल्या अनेक वर्षापासून इमरान इंडस्ट्रीपासून दुरावला आहे. त्यानंतर आता एक मोठी अपडेट समोर आहे. जवळपास १० वर्षानंतर इमरान खान इंडस्ट्रीत कमबॅक करणार असल्याची माहिती मिळते आहे.
इमरान खानने बालकलाकार म्हणून काम करत अभिनय क्षेत्रातील त्याची वाटचाल सुरु केली होती. काही चित्रपटांमध्ये त्याने आमिर खानच्या लहानपणाची भूमिका देखील वठवली आहे. मात्र, २००८ साली आलेल्या जाने तू या जाने ना चित्रपटाने त्याला खरा स्टारडम मिळाला. यामधील जेनिलिया डिसूझा त्याच्यासोबत फीमेल लीडमध्ये होती. त्यानंतर किडनॅप, लक,आय हेट लव्ह स्टोरीज यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकला. अखेरचा तो २०१५ मध्ये कंगना राणौतसोबत कट्टी-बट्टी सिनेमातदिसला.यानंतर इमरानने इंडस्ट्रीकडे पाठ फिरवली. मिडिया रिपोर्टनुसार,इमरान खान १० वर्षानंतर तो मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या एका वृत्तानुसार, इमरान खान बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाचे चित्रीकरण ऑगस्टमध्ये पूर्ण झालं असून सध्या ते पोस्ट-प्रॉडक्शन टप्प्यात आहे.येत्या २०२६ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. या इमरान खान कमबॅक करत असलेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दानिश असलम यांच्या खांद्यावर आहे. दोघेही बऱ्याच काळापासून खूप चांगले मित्र आहेत.मिळालेल्या माहितीनूसार, हा एक
रोम-कॉम चित्रपट आहे. त्यामुळे इमरानच्या या नव्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.