हर्षवर्धन राणेच्या बहुचर्चित 'दीवानियत' सिनेमाच्या नावात बदल, रिलीज डेटही ठरली; नवं पोस्टर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:58 IST2025-05-27T14:55:54+5:302025-05-27T14:58:25+5:30
मोहब्बत-नफरत की दास्तां..., हर्षवर्धन राणे अन् सोनम बाजवाच्या आगमी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

हर्षवर्धन राणेच्या बहुचर्चित 'दीवानियत' सिनेमाच्या नावात बदल, रिलीज डेटही ठरली; नवं पोस्टर व्हायरल
Harshvardhan Rane : कलाकारांचे चित्रपट गाजले की त्यांचा चाहता वर्गही वाढतो. चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळावं असं प्रत्येक कालाकाराला वाटत असतं. असाच एक चित्रपट म्हणजे 'सनम तेरी कसम'. या सिनेमाला रि-रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानंतर हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) पुन्हा एकदा चर्चेत आला. लवकरच तो एका रोमॅन्टिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात तो पंजाब दी कुडी सोनम बाजवा सोबत पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. अलिकडेच निर्मात्यांनी त्याच्या या आगामी चित्रपट 'दीवानियत'ची घोषणा केली होती. त्यात आता चित्रपटाच्या रिलीज डेटवरुनही पडदा हटविण्यात आला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर नुकतंच या चित्रपटाचं नवीन पोस्टर समोर आलं आहे. या नव्या पोस्टसोबत हर्षवर्धनच्या सिनेमाच्या नावातही थोडाफार बदल करण्यात आला आहे. त्यामुळे या पोस्टरने सिनेरसिकांचं लक्ष वेधलं आहे. हर्षवर्धन राणेच्या या आगामी चित्रपटाचं नाव 'एक दीवाने की दीवानियत' असं असणार आहे. 'एक दीवाने की दीवानियत' या रोमँटिक ड्रामा असलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पाहायला मिळतंय की, सोनम बाजवा हातात लाईटर घेऊन हर्षवर्धनने धरलेले गुलाबाचे फूल पेटवत आहे. एकीकडे सोनमही भावुक झाल्याचं दिसतंय तर हर्षवर्धनच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू येत आहेत. हर्षवर्धन राणेने सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "२ ऑक्टोबर २०२५... गांधी जयंती आणि दसऱ्याला थिएटरमध्ये प्रे नफरत आणि पाहा 'एक दीवाने की दीवानियत'...", . चित्रपटाचं हे पोस्टर पाहून प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
दिग्दर्शक मिलाप जावेरी 'दीवानियत' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर मुश्ताक शेख यांनी चित्रपटाचं कथानक लिहिलं आहे. येत्या २ ऑक्टोबरला म्हणजेच गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.