"त्या बाईने मला महिला स्वच्छतागृहाकडे ओढत नेलं अन्...", 'सन ऑफ सरदार २'च्या अभिनेत्यासोबत काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 11:45 IST2025-07-21T11:42:43+5:302025-07-21T11:45:27+5:30

"मला तिने स्त्रियांच्या स्वच्छतागृहाकडे ओढत नेत...", बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला किस्सा, काय घडलेलं? 

bollywood actor deepak dobriyal son of sardaar 2 fame talk about a women pulled him into ladies washroom ajay devgn rescued him know the reason | "त्या बाईने मला महिला स्वच्छतागृहाकडे ओढत नेलं अन्...", 'सन ऑफ सरदार २'च्या अभिनेत्यासोबत काय घडलेलं?

"त्या बाईने मला महिला स्वच्छतागृहाकडे ओढत नेलं अन्...", 'सन ऑफ सरदार २'च्या अभिनेत्यासोबत काय घडलेलं?

Deepak Dobriyal : सध्या हिंदी सिनेसृष्टीत अजय देवगण (ajay Devagn) आणि मृणाल ठाकूर (Mrnal Thakur) यांच्या सन ऑफ सरदार २ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अजय देवगणसमोर यावेळी रवी किशन आहे ज्यामुळे सिनेमाला रंगत येणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात अभिनेता दीपर डोबरियाल देखील पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम मेहनत घेते आहे. अलिकडेच, अजय देवगणसह चित्रपटाची संपूर्ण टीम 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी अनेक मजेदार किस्से शेअर केले. एक किस्सा दीपक डोबरियालशी संबंधित होता. तो किस्सा ऐकून कार्यक्रमातील प्रत्येकजण लोटपोट हसू लागला. 

नेहमी विनोदी भूमिकांमध्ये दिसणाऱ्या दीपक डोबरियालने 'सन ऑफ सरदार २' मध्ये एका महिलेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे दीपक एका महिलेच्या लूकमध्ये इतका सुंदर दिसत होता आणि त्याने असा अभिनय केला की सर्वजण त्याच्यावर प्रभावित झाले. सेटवर प्रत्येकजण जणू त्याच्यावर फिदा झाला होता. इतकंच नाहीतर चक्क एका सरदारजीने त्याला महिलेचा लूकमध्ये पाहून लग्नाचा प्रस्ताव मांडला होता. 

महिलेने थेट हात धरला अन्...

त्यानंतर अजय देवगणने या शोमध्ये दीपकसोबत घडलेला वॉशरुमचा किस्सा सांगितला. त्याविषयी सांगताना अभिनेता म्हणाला, "शूटिंगनंतरही दीपक कधीही त्याचा गेटअप बदलायचा नाही आणि तो नेहमीच महिलेच्या वेशभूषेत असायचा. तो चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत त्याच गेटअपमध्ये एका रेस्टॉरंटमध्येही गेला होता. तिथे देखील सगळ्यांचं लक्ष दीपककडे होतं. त्यानंतर पुढे अजय देवगण म्हणाला, दीपक बऱ्याचदा महिलांच्या वेशभूषेत पुरुषांच्या वॉशरूममध्ये जायचा आणि त्याला पाहून लोक ओरडाचे. त्यामुळे तेव्हा काय घडतंय हे पाहण्यासाठी आम्ही कायम उत्सुक असायचो."

पुढे दीपक डोबरियाल म्हणाला, "एकदा एक महिला चुकून पुरुषांच्या स्वच्छतागृहात आली. त्यावेळी मला तिथे पाहिल्यानंतर तिने माझा हात धरुन महिलांच्या स्वच्छतागृहात ओढून घेऊन गेली. कारण तिला वाटलंकी मी एक महिला आहे. त्यानंतर अजयने मध्यस्थी करत त्या महिलेला समजावलं की हा मुलगा आहे."

दरम्यान, दीपक डोबरियालने तनु वेड्स मनु, अंग्रेजी मीडियम यासारख्या सिनेमातमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. लवकरच तो 'सन ऑफ सरदार २' चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात अजय देवगण, मृणाल ठाकूर, रवी किशन, कुब्रा सैत, संजय मिश्रा, बिंदू दारा सिंह यांचीही भूमिका आहे. २५ जुलै रोजी सिनेमा रिलीज होत आहे. हा एक कॉमेडी ड्रामा असणार आहे.

Web Title: bollywood actor deepak dobriyal son of sardaar 2 fame talk about a women pulled him into ladies washroom ajay devgn rescued him know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.