Baap Of All Films First Look: बाप ऑफ ऑल फिल्म्स...! एकाच सिनेमात सनी, संजय, मिथुन, जॅकी; फॅन्स झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 16:50 IST2022-11-09T16:27:38+5:302022-11-09T16:50:12+5:30

Baap Of All Films First Look: होय, या चित्रपटाची स्टारकास्ट ऐकून तुमची उत्सुकता शिगेला पोहोचणार हे नक्की. जॅकी श्रॉफ, सनी देओल, मिथुन चक्रवर्ती आणि संजय दत्त असे एकापेक्षा एक दमदार चार स्टार्स या सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

Baap Of All Film Sunny Deol Mithun Chakraborty Jackie Shroff And Sanjay Dutt First Look Out | Baap Of All Films First Look: बाप ऑफ ऑल फिल्म्स...! एकाच सिनेमात सनी, संजय, मिथुन, जॅकी; फॅन्स झाले क्रेझी

Baap Of All Films First Look: बाप ऑफ ऑल फिल्म्स...! एकाच सिनेमात सनी, संजय, मिथुन, जॅकी; फॅन्स झाले क्रेझी

बाप ऑफ ऑल फिल्म्स..., असाच एक सिनेमा येत्या काळात तुमच्याआमच्या भेटीला येतोय. होय, या चित्रपटाची स्टारकास्ट ऐकून तुमची उत्सुकताही शिगेला पोहोचणार हे नक्की. जॅकी श्रॉफ (Jackie Shroff), सनी देओल (Sunny Deol), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आणि संजय दत्त (Sanjay Dutt ) असे एकापेक्षा एक दमदार चार स्टार्स या सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. चित्रपटाचं शूटींग सुरू झालं असून फर्स्ट लुकही रिलीज झाला आहे.
संजय दत्तने या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. ‘बाप ऑफ ऑल फिल्म्स... शूट धमाल, दोस्ती बेमिसाल...,’असं त्याने सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर करताना लिहिलं आहे.

या फोटोत मिथुन यांनी हाफ स्लीव्जचं लेदर जॅकेट घातलेलं आहे. डोक्यावर कॅप आणि माथ्यावर टिळा, असा त्यांचा लुक आहे. सनी देओलने ऑरेंज व व्हाईट ड्रेस घातलेला आहेत. त्याचा इन्टेन्स लुक जबरदस्त आहे. सनीच्या शर्टवर कैदी नंबर 22 असं लिहिलेलं दिसतंय. यावरून या चित्रपटात तो एका कैद्याची भूमिका साकारणार असल्याचा अंदाज आहे. संजय दत्त ब्राऊन जॅकेट आणि ब्लॅक टी-शर्ट व जीन्समध्ये आहे. जॅकीच्या गळ्यात स्कार्फ आहे, खाकी प्रिंट जॅकेट, लेदर शूज असा त्याचा टपोरी लुक पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. या चित्रपटाच्या नावाचा खुलासा अद्याप झालेला नाही.

जॅकी श्रॉफने गेल्या जून महिन्यात या चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत जॅकी, मिथुन व संजय दत्त असे तिघे दिसले होते. सनी देओल मात्र मिसींग होता. जहां चार यार मिल जाए... अरे चौथा किधर है भिडू, असं हा फोटो शेअर करताना त्याने लिहिलं होतं.

Web Title: Baap Of All Film Sunny Deol Mithun Chakraborty Jackie Shroff And Sanjay Dutt First Look Out