आयुषमान खुरानाच्या पत्नीला ७ वर्षांनंतर पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, म्हणाली, "राऊंड २..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 13:19 IST2025-04-07T13:18:47+5:302025-04-07T13:19:53+5:30

Ayushmann Khurrana Wife Breast Cancer: ताहिरा कश्यपने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.

Ayushmann Khurrana s wife tahira kashyap diagnosed with breast cancer again after 7 years says round 2 | आयुषमान खुरानाच्या पत्नीला ७ वर्षांनंतर पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, म्हणाली, "राऊंड २..."

आयुषमान खुरानाच्या पत्नीला ७ वर्षांनंतर पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, म्हणाली, "राऊंड २..."

अभिनेता आयुषमान खुरानाची (Ayushmann Khurrana) पत्नी ताहिरा कश्यपने (Tahira Kashyap) ७ वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सरवर मात केली होती. मात्र आता दुर्दैवाने तिला पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. २०१८ मध्ये कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर ती यशस्वीरित्या त्यातून बाहेर आली होती. आता पुन्हा त्याच दिव्याला तिला सामोरं जावं लागणार आहे. ताहिरानेच सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. तसंच यावेळीही हिंमतीने याचा सामना करणार असा तिने विश्वास दर्शवला आहे.

ताहिरा कश्यपनेइन्स्टाग्रामवर लिहिले, "७ वर्ष नियमित स्क्रीनिंग केल्यानंतर...हा एक दृष्टिकोन आहे. मला पुन्हा त्यासोबत जायचं आहे. मी सर्वांना हेच सुचवेन की नियमित मॅमोग्राम करा. माझ्यासाठी हा राऊंड २ आहे..मी तरी यासाठी तयार आहे." 

या पोस्टसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "आयुष्यात जे जे काही वाट्याला येतं त्यातून काहीतरी चांगलंच करण्याचा प्रयत्न करा. कारण त्यातून तुम्हालाही आनंद मिळणार असतो आणि यापुढेही तुम्ही चांगलंच कराल ही तुम्हाला खात्री असते. जागतिक आरोग्य दिन असो वा नसो स्वत:ची शक्य तितकी काळजी घ्या. पुन्हा एकदा कॅन्सरला सामोरं जाण्यासाठी मी सज्ज आहे. चला."


ताहिराच्या या पोस्टवर आयुषमानने कमेंट करत लिहिले, "माय हिरो'. तसंच इतरांनीही कमेंट करत तिची हिंमत वाढवली आहे. 'याहीवेळी तू नक्की यावर मात करशील' अशा कमेंट्स आल्या आहेत.

ताहिराला २०१८ साली पहिल्यांदा ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. यावर मात करत ती बाहेर आली. तिने याविषयी जनजागृती केली. तिचा संपूर्ण प्रवास उलगडला. ब्रेस्ट कॅन्सरचे व्रणही तिने दाखवले होते. आता पुन्हा ती यावर मात करायला सज्ज झाली आहे. २००८ मध्ये आयुषमान आणि ताहिरा लग्नबंधनात अडकले. त्याआधी बरीच वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. त्यांना विराजवीर १३ वर्षांचा मुलगा आणि वरुष्का ही ११ वर्षांची मुलगी आहे.

Web Title: Ayushmann Khurrana s wife tahira kashyap diagnosed with breast cancer again after 7 years says round 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.