असरानी यांची 'ही' इच्छा अपूर्णच राहिली, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 11:37 IST2025-10-21T11:34:52+5:302025-10-21T11:37:12+5:30

असरानी यांचं काल निधन झालं. दरम्यान त्यांचं एक स्वप्न होतं ते अपूर्णच राहिलं.

Asrani last wish remained unfulfilled with akshay kumar bhooot bangla and haiwan | असरानी यांची 'ही' इच्छा अपूर्णच राहिली, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ

असरानी यांची 'ही' इच्छा अपूर्णच राहिली, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ

ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी (Govardhan Asrani) यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूड आणि त्यांचे चाहते शोकाकुल झाले आहेत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी 'शोले'मधील 'जेलर' सारख्या अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या. मात्र शेवटच्या काळात त्यांची एक इच्छा होती, ती मात्र अपूर्णच राहिली आहे. असरानी यांच्या चाहत्यांना याविषयी समजताच त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

असरानी हे त्यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये अभिनेता अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) दोन आगामी चित्रपटांमध्ये काम करण्यास खूप उत्सुक होते. या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी त्यांची तयारीही सुरु होती. यापैकी एक सिनेमा होता तो म्हणजे 'भूत बंगला'. तर दुसरा सिनेमा होता 'हैवान'. सूत्रांनुसार, असरानी यांना हे दोन्ही चित्रपट खूप आवडले होते आणि त्यांनी या चित्रपटांमध्ये काम करण्याची तयारी दर्शवली होती. त्यांना या चित्रपटांमधील भूमिकांमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायचं होतं. परंतु त्यांचं निधन झाल्याने त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली

असरानी यांचा अभिनय आणि कामाप्रती असलेला उत्साह शेवटपर्यंत कायम होता. वयानुसार शारीरिक मर्यादा आल्या तरीही, त्यांना कॅमेऱ्यासमोर सक्रिय राहायचे होते. या दोन्ही चित्रपटांवर काम सुरू होण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांना मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळाली नाही. त्यांच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत दुःखद बाब आहे.

Web Title : असरानी की आखिरी इच्छा अधूरी; प्रशंसकों ने व्यक्त किया दुख।

Web Summary : दिग्गज अभिनेता गोवर्धन असरानी के निधन से बॉलीवुड दुखी है। वह अक्षय कुमार के साथ 'भूत बंगला' और 'हैवान' में काम करने के इच्छुक थे, दर्शकों का मनोरंजन करना चाहते थे। दुख की बात है, उनकी इच्छा अधूरी रह गई।

Web Title : Asrani's last wish unfulfilled; fans express grief and sorrow.

Web Summary : Veteran actor Govardhan Asrani's death has saddened Bollywood. He desired to work with Akshay Kumar in 'Bhoot Bangla' and 'Haiwaan,' eager to entertain audiences again. Sadly, his wish remained incomplete.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.