सलमान खानबद्दल प्रश्न ऐकताच अरबाज खान चिडला; सर्वांसमोर रिपोर्टरला झापलं, म्हणाला- "तू आधी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:02 IST2025-11-06T13:02:27+5:302025-11-06T13:02:56+5:30
पत्रकार परिषदेत सलमान खानबद्दल प्रश्न विचारताच अरबाज चांगलाच वैतागला. काय घडलं नेमकं? बघा व्हिडीओ

सलमान खानबद्दल प्रश्न ऐकताच अरबाज खान चिडला; सर्वांसमोर रिपोर्टरला झापलं, म्हणाला- "तू आधी..."
अरबाज खान हा बॉलिवूडचा यशस्वी अभिनेता आणि दिग्दर्शक. अरबाजला त्याचा भाऊ आणि सुपरस्टार सलमान खानइतकं यश बॉलिवूडमध्ये मिळालं नसलं तरीही तो मीडियामध्ये चर्चेत आहे. अरबाज खानचा आगामी सिनेमा 'काल त्रिघोरी'चा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलर लाँचच्या वेळेस पत्रकाराने सलमान खानबद्दल अरबाजला प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. परंतु हे ऐकताच अरबाजने सर्वांसमोर त्या पत्रकाराला चांगलंच झापलं. काय घडलं नेमकं?
अरबाजचा पारा चढला, काय घडलं?
पत्रकाराने अरबाजला विचारलं की, ''सलमान खानचे किस्से आम्हाला माहितच आहेत.'' त्यावेळी अरबाजने त्या पत्रकाराला लगेच अडवलं. ''काय किस्से माहित आहेत तुला? सलमान खान आणि कुटुंबाला मध्ये आणणं गरजेचं आहे का? हा प्रश्न त्याचं नाव न घेताही विचारला जाऊ शकतो ना? तुला मी खूप आधीपासून ओळखतो. जोवर तू असा काही प्रश्न विचारत नाहीस तोवर तुला चैन पडत नाही. सर्वांचे प्रश्न संपण्याची तू वाट बघतोस त्यानंतर असा प्रश्न विचारतोस.''
''तू आधी प्रश्न पुन्हा चांगल्या भाषेत विचार. जर तुला किस्से माहित आहेत तर वारंवार तेच कशाला विचारतोयस. तू जेव्हा सलमान खानची मुलाखत घेशील तेव्हा त्याला हे विचार. सध्या काल त्रिघोरीबद्दल चर्चा कर. माझा छोटा भाऊ सोहेलचं नाव घेऊन तू फिरत आहेस. जणू काही तुझ्यासाठी ते ओझं आहे.'', अशाप्रकारे अरबाजने त्या पत्रकाराची बोलती बंद केली. अरबाज खानची प्रमुख भूमिका असलेला 'काल त्रिघोरी' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमात अरबाजसोबत महेश मांजरेकर, आदित्य श्रीवास्तव, रितूपर्णा सेनगुप्ता या कलाकारांची प्रमुख भूमिका असणार आहे. १५ नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.