मुंबईत पोहोचताच पती विराट कोहलीसोबत श्रीदेवी यांच्या घरी पोहोचली अनुष्का शर्मा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 19:48 IST2018-03-04T14:18:23+5:302018-03-04T19:48:23+5:30

बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर २८ फेब्रुवारीला अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी श्रीदेवी यांचे ...

Anushka Sharma reached her house with husband Virat Kohli when she reached Mumbai. | मुंबईत पोहोचताच पती विराट कोहलीसोबत श्रीदेवी यांच्या घरी पोहोचली अनुष्का शर्मा!

मुंबईत पोहोचताच पती विराट कोहलीसोबत श्रीदेवी यांच्या घरी पोहोचली अनुष्का शर्मा!

लिवूडच्या प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर २८ फेब्रुवारीला अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी श्रीदेवी यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. काहींनी त्यांच्या घरी भेट देऊन कपूर परिवाराचे सांत्वन केले, तर अनेकांनी त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली. मात्र, काही कलाकार असेही होते, जे त्यांच्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांना श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता आले नाही. यामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या नावाचा समावेश आहे. 





जेव्हा श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा अनुष्का शर्मा तिच्या आगामी ‘सुई-धागा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. ज्यामुळे तिला श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता आले नाही. अनुष्का काल रात्रीच भोपाळ येथून ‘सुई-धागा’ची शूटिंग करून मुंबईत परतली आहे. मुंबईत येताच तिने पती विराट कोहलीसोबत श्रीदेवी यांचे घर गाठले. याठिकाणी तिने श्रीदेवीच्या परिवारातील सदस्यांचे सांत्वन केले. यावेळी विराटनेही श्रीदेवी यांच्या परिवारातील सदस्यांना धीर दिला. 







दरम्यान, बोनी कपूर त्यांच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी कपूरसह रामेश्वरम येथे श्रीदेवी यांच्या अस्थिंचे विसर्जन करण्यासाठी गेले होते. याठिकाणी त्यांनी श्रीदेवी यांच्या अस्थी समुद्रात विसर्जित केल्या. श्रीदेवी यांच्या अचानक निधनामुळे बॉलिवूडसह त्यांच्या तमाम चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण कुठलाही आजार नसताना श्रीदेवी यांनी अचानकच या जगाचा निरोप घेतल्याने अनेकांना यावर विश्वास ठेवणे अवघड होत आहे. श्रीदेवी यांनी त्यांच्या ५० वर्षांच्या करिअरमध्ये विविध भाषांमध्ये तब्बल ३०० चित्रपटांत काम केले. त्यांना पहिल्या महिला सुपरस्टार असेही म्हटले जात होते. 

Web Title: Anushka Sharma reached her house with husband Virat Kohli when she reached Mumbai.