Anurag Kashyap : 'नागराज जे बोलतो ते...' अनुराग कश्यपची 'सैराट' फेम नागराज मंजुळेवर प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 15:00 IST2023-02-10T14:55:03+5:302023-02-10T15:00:50+5:30
'झुंड' नंतर तर बॉलिवूडही नागराजच्या प्रेमातच पडले.

Anurag Kashyap : 'नागराज जे बोलतो ते...' अनुराग कश्यपची 'सैराट' फेम नागराज मंजुळेवर प्रतिक्रिया
Anurag Kashyap : मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळेने (Nagraj Manjule) 'सैराट' सिनेमातून मराठी सिनेसृष्टीला यशाचा मार्ग दाखवला. यानंतर नागराजने 'नाळ', 'फॅंड्री' हे देखील हिट चित्रपट दिले. नागराजच्या कामाची दखल बॉलिवूडनेही घेतली. महानायक अमिताभ बच्चन यांनी झुंड सिनेमात नागराजसोबत काम केले. 'झुंड' नंतर तर बॉलिवूडही नागराजच्या प्रेमातच पडले. दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही नुकतीच नागराज मंजुळेवर प्रतिक्रिया दिली आहे. नागराज आपल्या लोकांसाठी जे बोलतो ते करतो असे त्याने म्हणले आहे.
नुकतेच लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यपला नागराज मंजुळेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अनुराग म्हणाला, 'खूप मस्त माणूस आहे. आपल्या माणसांसाठी जे बोलतो, जे करायचं आहे ते तो करतो. अनेक चांगले चित्रपट त्याने दिले आहेत. खूप चांगला अभिनेता आहे आणि मला एक दिवस त्याला कास्टही करायचे आहे.'
अनुराग कश्यप नेहमीच चांगल्या टॅलेंटला शोधून त्यांना पुढे आणण्याचं काम करतो. 'झुंड' सिनेमावेळी अनुरागने नागराजची भेट घेत त्याचे कौतुकही केले होते. नागराजला थेट मिठी मारत आतापर्यंत पाहिलेला सर्वात चांगला चित्रपट असे म्हणले होते. आता अनुराग आणि नागराज एकत्र कधी काम करतात याची चाहत्यांना उत्सुकता आहे.