कंगना राणौतचा चित्रपट माणिकर्णिका मध्ये अशी दिसणार अंकिता लोखंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 11:17 IST2017-11-08T05:47:17+5:302017-11-08T11:17:17+5:30

काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला कंगना राणौतचे 'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटातील काही फोटो दाखवले होते. हे ...

Ankita Lokhande looks like Kangna Ranaut's film Manikarnika | कंगना राणौतचा चित्रपट माणिकर्णिका मध्ये अशी दिसणार अंकिता लोखंडे

कंगना राणौतचा चित्रपट माणिकर्णिका मध्ये अशी दिसणार अंकिता लोखंडे

ही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला कंगना राणौतचे 'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटातील काही फोटो दाखवले होते. हे फोटो प्रेक्षकांना आवडले देखील होते. आता आमच्या हाती याच चित्रपटात महत्त्वाची भूमिका करणाऱ्या अंकिता लोखंडेचे काही फोटो हाती लागले आहेत. अंकिताने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. त्यात तिने महाराष्ट्रीयन पद्धतीची साडी नेसलेली दिसून येत आहे. या फोटोत तिच्या बरोबर वैभव तत्त्ववादी सुद्धा दिसतो आहे. अंकिताने हे फोटो शेअर करून त्यावर "झलकारी बाई आज के मर्द के दिल का रस्ता जानती है" असे लिहिले आहे. जयपूरच्या आमेर किल्ल्यामध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. 



कंगना आणि अंकिताचा हा चित्रपट राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित आहे. अंकिता लोखंडे याच चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. झलकारीबाईच्या सल्ल्यानुसार राणीने झाशीचा किल्ला रात्रीच्या अंधारात सोडला. इंग्रज सेनानी ह्यू रोज याच्या सैन्याने झाशीच्या किल्ल्यावर निकराचा हल्ला केला असता, झलकारीबाईच्या सल्ल्यानुसार राणीने झाशीचा किल्ला रात्रीच्या अंधारात सोडला. यादरम्यान झलकारीबाई यांनी राणीप्रमाणे वेश धारण करून ह्यू रोजच्या सैन्याशी युद्ध केले. पण ते नाटक इंग्रज सैनिकांना समजले. त्यांनी झलकारीबाईला पकडले व फासावर लटकवले होते. यात अतुल कुलकर्णी तात्याराव टोपेंच्या भूमिकेत दिसेल तर वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. वैभव हीच भूमिका साकारणार आहे.

चित्रपट माणिकर्णिकाच्या आधी अशी खबर होती की अंकिता लोखंडे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी च्या आगामी चित्रपट पद्मावती मध्ये दिसेल पण काही कारणास्तव तिने हा चित्रपट साइन नाही केला. नंतर मग तिने चित्रपट माणिकर्णिका चा हिस्सा होण्याचे ठरवले. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Ankita Lokhande looks like Kangna Ranaut's film Manikarnika