अनन्या पांडेला करायचे आहेत तीन लग्न, हार्दिकसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान जुना video व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 15:22 IST2024-07-30T15:22:13+5:302024-07-30T15:22:30+5:30
अभिनेत्री अनन्या पांडे ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अनन्या पांडेला करायचे आहेत तीन लग्न, हार्दिकसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान जुना video व्हायरल!
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नामधील अभिनेत्री अनन्या पांडेचा (Ananya Pandey) डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये हार्दिक पांड्यासोबत (Hardik Pandya ) डान्स करताना दिसून आली होती. त्यांचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी अनन्याचं नाव हार्दिक सोबत जोडण्यास सुरुवात केली. यातच आता अनन्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती लग्नाबद्दल बोलताना दिसून येत आहे.
अभिनेत्रीची एक जुनी क्लिप आता Reddit वर व्हायरल होत आहे. ही क्लिप 'Fabulous Lives of Bollywood Wives' च्या दुसऱ्या सीझनची आहे. यात अनन्या ही शनायासोबत लग्नाबद्दल बोलताना दिसून येत आहे. यामध्ये ती पारंपारिक लग्न करण्याची इच्छा असल्याचं म्हणते. शिवाय तीन पद्धतीमध्ये लग्न करण्याबद्दलही बोलताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
This conversation 😂
byu/Disastrous_Bad9326 inBollyBlindsNGossip
अनन्या अनेक दिवसांपासून आदित्य रॉय कपूरला डेट करत होती. यानंतर एप्रिलपासून त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र, या दोन्ही कलाकारांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अनन्या आगामी काळात 'शंकरा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आर माधवन आणि अक्षय कुमारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा एक बायोपिक चित्रपट आहे, ज्याची कथा 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित असेल.