इम्तियाज अलीच्या नजरेस पडली अन्... 'या' 'स्टार किड' लागली लॅाटरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:18 IST2025-01-21T18:13:11+5:302025-01-21T18:18:35+5:30

अभिनेत्रीसाठी वर्ष २०२५ हे खास ठरणार असल्याचं दिसतंय.

Ananya Panday And Vedang Raina To Star In Imtiaz Ali’s Next Film What We Know | इम्तियाज अलीच्या नजरेस पडली अन्... 'या' 'स्टार किड' लागली लॅाटरी!

इम्तियाज अलीच्या नजरेस पडली अन्... 'या' 'स्टार किड' लागली लॅाटरी!

अनन्या पांडे (Ananya Panday) बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिस्ट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. अनन्यानं २०१९ मध्ये 'स्टुडंड ऑफ द इअर २' या चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांत अनन्याने फिल्म इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  आघाडीच्या नायिकांच्या यादीत आपलं स्थान पक्कं केलंय. आता वर्ष २०२५ हे अनन्यासाठी खास ठरणार असल्याचं दिसतंय.

अनन्या पांडेचा मागच्या वर्षी 'सीटीआरएल' हा चित्रपट रिलीज झाला होता. याखेरीज 'बॅड न्यूज'मध्ये तिने कॅमिओ केला होता. करियर सुरू होऊन जवळपास सहा वर्षे होत आली तरी अद्याप अनन्याच्या नावावर सुपरहिट चित्रपटाची नोंद नाही. भविष्यात मात्र ती ही उणीव भरून निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

अनन्याच्या 'शंकरा' महत्त्वपूर्ण चित्रपटाचं शुटिंग पूर्ण झालं आहे. तर 'चांद मेरा दिल' या चित्रपटातही दिसणार आहे. याखेरीज 'गली बॅाय'च्या सिक्वेलमध्ये अनन्याची जोडी विकी कौशलसोबत जमल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर फिल्ममेकर इम्तियाज अलीच्या (Imtiaz Ali) चित्रपटातही ती काम करत असल्याचे समजते.

 आजवर बरेच सुपरहिट चित्रपट देणाऱ्या इम्तियाजच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे हे जणू अनन्याला लॅाटरी लागण्यासारखेच आहे. या चित्रपटात अनन्या मुख्य भूमिकेत असून, तिची जोडी वेदांग रैनासोबत जुळल्याची माहिती आहे. वेदांग मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या आलिया भटच्या 'जिगरा'द्वारे मोठ्या पडद्यावर दाखल झाला होता. अनन्या आणि वेदांग यांनी या चित्रपटासाठी ऑडिशन दिलं असून, लूक टेस्टही झाल्याचे समजते. अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आता अनन्याच्या हाती चार चित्रपट असल्याने तिचे चाहतेही प्रचंड खूश आहेत. 

Web Title: Ananya Panday And Vedang Raina To Star In Imtiaz Ali’s Next Film What We Know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.