अमिताभ-जयाच्या लग्नाचा ४३ वा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 17:11 IST2016-06-03T11:41:05+5:302016-06-03T17:11:05+5:30

बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाच्या ४३ वा वाढदिवस आज शुक्रवारी उत्साहात साजरा झाला. ऐश्वर्या आणि ...

Amitabh-Jyoti's wedding for the 43rd birthday | अमिताभ-जयाच्या लग्नाचा ४३ वा वाढदिवस

अमिताभ-जयाच्या लग्नाचा ४३ वा वाढदिवस

ग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाच्या ४३ वा वाढदिवस आज शुक्रवारी उत्साहात साजरा झाला. ऐश्वर्या आणि अभिषेकने याबाबतचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर टाकले आहे. ‘४३ वा लग्नाचा वाढदिवस आनंदाचा जावो’ अशा शुभेच्छा संदेश अभिषेकने लिहिला.
अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देणाºयांचे आभार मानले आहेत. 
३ जून १९७३ रोजी या अमिताभ-जया यांचे लग्न झाले. आपल्या ब्लॉगवर अमिताभ यांनी लग्नासंदर्भात लिहिले आहे. लग्नाच्या वेळी मी सातव्या रस्त्यावरील जेव्हीपीडी स्कीममध्ये असलेल्या घरात भाड्याने राहत होतो. त्या घराचे नाव ‘मंगल’ होते. लार्सन अँड टुब्रोच्या कर्मचाºयांकडून आम्ही ते भाड्याने घेतले होते. मलबार हिल येथे लग्नाचे स्थळ शोधण्यासाठी मी जया यांच्या वडिलांच्या मित्राना भेटण्यास निघाले होतो. त्याचवेळी आमचे शेजारी बाहेर धावत आले. त्यावेळी पाऊस पडत होता. ते म्हणाले हे शुभचिन्ह आहे. मी माझा चालक नागेशला घेऊन लाँग ड्राईव्हवर गेलो. काही काळानंतर नागेशने जयाच्या मोलकरणीसोबत लग्न केले. नागेशचा मुलगा आता जलसामध्ये काम करतो आहे. काही वर्षापूर्वी नागेश वारला.’ 

बच्चन यांनी मंगलच्या दरवाज्याजवळ या नव्या जोडप्याचा फोटोही प्रसिद्ध केला आहे.
अमिताभ आणि जया यांनी बन्सी बिरजू, एक नजर हे लग्नापूर्वी त्यानंतर अभिमान, जंजीर, मिली, शोले, सिलसिला, कभी खुशी कमी गम आणि द्रोण हे चित्रपट केले. आता  आर बल्की यांच्या की अँड का मध्ये दोघे एकत्र दिसले.
{{{{twitter_post_id####}}}}

 

Web Title: Amitabh-Jyoti's wedding for the 43rd birthday