अल्लू अर्जुनच्या वडिलांनीच बॉलिवूडला दिला होता १०० कोटी कमाई करणारा पहिला सिनेमा, आठवतं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 16:13 IST2022-01-31T16:12:12+5:302022-01-31T16:13:35+5:30
Allu Arjun's Father Allu Arvind : पुष्पामुळे आता अल्लू अर्जुनचं बॉलिवूडमधीलही वजन वाढणार आहे. पण अनेकांना माहीत नाही की, अल्लू अर्जुनचे वडील प्रसिद्ध निर्माते अल्लू अरविंद यांचं हिंदी सिनेमाशी फार जुनं नातं आहे.

अल्लू अर्जुनच्या वडिलांनीच बॉलिवूडला दिला होता १०० कोटी कमाई करणारा पहिला सिनेमा, आठवतं का?
(Photo: © Twitter/Allu Arjun)
अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa) सिनेमा कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज आहे. सुकुमारच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या सिनेमाचा दुसरा भाग येणार असून प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट बघत आहे. 'पुष्पा' हिंद व्हर्जनने चांगलीच कमाई केली आहे. ५० कोटी रूपये कमाई आधीच झाली आहे. पुष्पामुळे आता अल्लू अर्जुनचंबॉलिवूडमधीलही वजन वाढणार आहे. पण अनेकांना माहीत नाही की, अल्लू अर्जुनचे वडील प्रसिद्ध निर्माते अल्लू अरविंद (Allu Arvind) यांचं हिंदी सिनेमाशी फार जुनं नातं आहे.
अनेकांना माहीत नसेल, पण अल्लू अरविंद यांनी बॉलिवूडला पहिला १०० कोटी रूपये कमाई केलेला ब्लॉकबस्टर सिनेमा दिला होता. २००८ मध्ये त्यांनी 'गजनी' (Gajini) सिनेमाची निर्मित केली होती. हा २००५ साली आलेल्या तमिळ 'गजीनी' सिनेमाचा रिमेक होता. यात आमिर खान आणि असीनने मुख्य भूमिका साकारली होती. हा बॉलिवूडचा पहिला १०० कोटी रूपये कमावणारा सिनेमा होता. अल्लू अरविंद यांनी याआधीही काही हिंदी सिनेमांची निर्मिती केली होती.
काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत अल्लू अर्जुनला वडील अल्लू अरविंदसोबत कामाबाबत विचारण्यात आलं होतं. तसेच तो कधी बॉलिवूड डेब्यू करणार असंही विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्याने सांगितलं की, कशाप्रकारे त्याचे वडील आधीच बॉलिवूड सिनेमे करत आहेत. पण त्याला कास्ट करत नाहीयेत. त्यानेच तेव्हा सांगितलं की, त्याच्या वडिलांनी बॉलिवूडचा पहिला १०० कोटी रूपये कमावणारा सिनेमा बनवला होता.
'गजनी'सोबतच अल्लू अरविंद यांनी 'प्रतिबंध', 'द जंटलमन', 'कौन?', 'कुवांरा' आणि 'कलकत्ता मेल' या सिनेमांची निर्मिती केली आहे. त्यांनी निर्मिती केलेला शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूरचा 'जर्सी' लवकरच रिलीज होणार आहे. तसेच त्यांनी 'शहजादा' या सिनेमाचीही निर्मिती केली आहे. यात कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन दिसणार आहेत. 'शहजादा' हा अल्लू अर्जुनच्या Ala Vaikunthapurramuloo या सिनेमाचा रिमेक असेल.