ना स्टारडम ना सिक्युरिटी! अभिनेत्याने खाल्ला हातगाडीवरचा मसाला डोसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 18:00 IST2021-09-17T18:00:00+5:302021-09-17T18:00:00+5:30
Allu arjun: सेलिब्रिटी रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या पार्टीमध्ये वैगरे चाहत्यांना भेटण्याचा योग तसा दुर्मिळच आहे.

ना स्टारडम ना सिक्युरिटी! अभिनेत्याने खाल्ला हातगाडीवरचा मसाला डोसा
कलाविश्वातील सेलिब्रिटी कायमच त्यांच्या स्टारडम, लक्झरी लाइफस्टाइल यामुळे चर्चेत येत असतात. या सेलिब्रिटींना साधं भेटायचं जरी असेल तरीदेखील पंचतारांकित हॉटेल्स किंवा त्यांच्या घराबाहेर वाट पाहावी लागते. त्यामुळे हे सेलिब्रिटी रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या पार्टीमध्ये वैगरे चाहत्यांना भेटण्याचा योग तसा दुर्मिळच आहे. परंतु, सध्या सोशल मीडियावर अशा एका अभिनेत्याची चर्चा होतीये जो त्याचा स्टारडम विसरुन थेट मसाला डोसा खाण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबला.
सेलिब्रिटींना कोणतंही स्ट्रिटफूड खावसं वाटलं की त्यांचे शेफ त्यांना वेगवेगळे पदार्थ तयार करुन देत असतात. यात कलाकारांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. परंतु, दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याने त्याच्या आरोग्याचा किंवा स्टारडमचा विचार न करता थेट हातगाडीवरील मसाला डोशाची चव घेतली आहे. विशेष म्हणजे त्याने केवळ या हातगाडीवरचा मसाला डोसाच खाल्ला नाही. तर त्याने या डोसेवाल्याला मदतीचा हातही दिला आहे.
अमृता सुभाषचा नवरा कोण माहितीये का?; 'मुंबई डायरीज्'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका
अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी पुष्पा या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण आंध्र प्रदेशमध्ये सुरु असून Maredumilli या जंगलातून जात असताना अल्लू अर्जुनला भूक लागली आणि त्याचवेळी त्याला रस्त्यावरील डोसा विक्रेत्याची हातगाडी दिसली. विशेष म्हणजे अल्लूने याच ठिकाणी गाडी थांबवत डोसा खाल्ला.
Icon StAAr @alluarjun had breakfast at a road side tiffin centre near Gokavaram, AP.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) September 13, 2021
Man of simplicity for a reason!#AlluArjun#ThaggedheLe#Pushpapic.twitter.com/7XOjyvBTgO
दरम्यान, अल्लूने यावेळी डोसेविक्रेत्याची संवाद साधला आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. विशेष म्हणजे या विक्रेत्याच्या परिस्थितीविषयी कळताच अल्लूने त्याला हजार रुपये देऊ केले. मात्र, या व्यक्तीने ते नाकारले. त्यामुळे अल्लूने या व्यक्तीला हैदराबादमध्ये येऊन भेट घेण्यास सांगितलं. अल्लूच्या याच स्वभावामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे.