अमृता सुभाषचा नवरा कोण माहितीये का?; 'मुंबई डायरीज्'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 04:30 PM2021-09-17T16:30:00+5:302021-09-17T16:30:00+5:30

Mumbai Diaries 26/11 : अमृता वयाच्या १७ व्या वर्षी संदेशच्या प्रेमात पडली. सोनालीच्या घरी तिला बर्थ डे विश करायला गेलेल्या अमृताने संदेशला घरात पाहिलं आणि पाहताक्षणीच ती त्याच्या प्रेमात पडली.

मराठीसोबतच हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. अभिनयासोबत अमृता तिच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असते. त्यामुळेच या लोकप्रिय अभिनेत्रीचा नवरा कोण ते आज जाणून घेऊयात.

अभिनेत्री अमृता सुभाषच्या नवऱ्याचं नाव संदेश कुलकर्णी असून या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. विशेष म्हणजे संदेश हा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सख्खा भाऊ आहे.

अमृता वयाच्या १७ व्या वर्षी संदेशच्या प्रेमात पडली. सोनालीच्या घरी तिला बर्थ डे विश करायला गेलेल्या अमृताने संदेशला घरात पाहिलं आणि पाहताक्षणीच ती त्याच्या प्रेमात पडली.

संदेशसोबत छान मैत्री झाल्यानंतर अमृतानेच त्याला प्रपोज केलं.

अमृताचा पती संदेश कुलकर्णी लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. संदेश आणि अमृताने ब-याच वेळा एकत्र काम केले आहे.

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या मुंबई डायरीज् या सीरिजमध्ये अमृताचा पती संदेश झळकला आहे.

मुंबई डायरीज् मध्ये संदेशने एसीपी तावडे ही भूमिका साकारली आहे.