आलिया भट दुसऱ्यांदा आई होणार? 'कान्स'मधील 'त्या' लूकवरुन रंगल्या प्रेग्नंसीच्या चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 15:53 IST2025-05-24T15:52:14+5:302025-05-24T15:53:17+5:30
आलिया भटने कान्समध्ये दिली प्रेग्नंसीची हिंट?

आलिया भट दुसऱ्यांदा आई होणार? 'कान्स'मधील 'त्या' लूकवरुन रंगल्या प्रेग्नंसीच्या चर्चा
अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhatt) यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं. तिचे दोन्ही लूक्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ती यंदा कान्समध्ये जाणार अशी चर्चा होतीच. मात्र नंतर भारत-पाक तणावाच्या परिस्थितीमुळे तिने यंदा कानस् वारी रद्द केल्याचीही चर्चा झाली. आता कान्सच्या शेवटच्या दोन दिवशी आलिया तिथे हजर झाली आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला. मात्र आता आलियाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा रंगल्या आहेत. आलियाच्या कान्समधील दुसऱ्या लूकचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी असा अंदाज लावला आहे.
आलिया भटने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दुसऱ्या लूकसाठी निळा शिमरी गाऊन परिधान केला होता. त्यावर अनेक चमकते स्टोन्स लावण्यात आले होते. यामध्ये आलिया डॅझलिंग स्टार सारखी शाई करत होती. या लूकमधले तिचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. काही फोटोंमध्ये तिचं पोट दिसत असल्याचा अनेकांनी दावा केला आणि ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चाही सुरु झाल्या. 'आलिया दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे?','असं वाटतंय आलिया पुन्हा आई होणार आहे','ही नक्कीच प्रेग्नंट आहे'.
Alia Bhatt at the L’Oreal Lights On Women Awards at Cannes
byu/Big-Criticism-8926 inBollyBlindsNGossip
काही लोकांना आलियाचा कान्स लूक फारसा आवडला नाही. 'आलिया थकलेली दिसत आहे तिला आरामाची गरज आहे','या लूकमध्ये बऱ्याच गोष्टी कमी वाटत आहेत','हिचा स्टायलिस्ट कोण आहे? कसा लूक केलाय' अशा कमेंट्सही आल्या आहेत.
दरम्यान आलिया भटने आधीच एका मुलाखतीत दुसऱ्यांदा आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसंच यावेळी मुलगा झाला तर त्याचं नावही तिने ठरवलं असल्याचं ती म्हणाली होती. आलियाची लेक राहा आता २ वर्षांची आहे.